बेळगाव लाईव्ह :प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदान करण्यात येणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या राष्ट्रपती पदकासाठी कर्नाटक राज्यातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी असे एकूण 21 जण पात्र ठरले आहेत. यापैकी दोघा पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक, तर उर्वरित 19 जणांना पोलीस राष्ट्रपती उल्लेखनीय सेवा पदक प्राप्त झाले आहे.
कर्नाटकातील बसवराज शरणप्पा चिळ्ळी डीआयजीपी, केएसआरपी बंगलोर आणि हंजा हुसेन कमांडट, केएसआरपी तुमकुर यांनी राष्ट्रपती विशेष सेवा पदक पटकावले आहे.
त्याचप्रमाणे राष्ट्रपती उल्लेखनीय सेवा पदक विजेत्यांमध्ये रेणुका के सुकुमार डीआयजीपी, डीसीआरआय, बंगळूर. संजीव एम पाटील एआयजीपी जनरल पोलीस मुख्यालय. बी. एम. प्रसाद कमांडट आयआरबी, कोप्पळ. गोपाळकृष्ण बी. गौडर डीवायएसपी, चिक्कोडी उपविभाग बेळगाव.
गोपाळ जोगीन एसीपी, सीसीबी बेंगलोर. वीरेंद्र नायक यांना डेप्युटी कमांडंट के एस आर पी बंगलोर. गुरुबसवराज पोलीस निरीक्षक लोकायुक्त चित्रदुर्ग
जयराज पोलीस निरीक्षक गोविंदपुर पोलीस ठाणे बेंगलोर. प्रदीप बी. आर. पोलीस वलय निरीक्षक हळेनरसीपुर हासन. मोहम्मद मुकरम पोलीस निरीक्षक सीसीबी बेंगलोर आदींचा समावेश आहे. कोण आहे