बेळगाव लाईव्ह :भारतीय शरीरसौष्ठव संघटनेच्या आयबीबीएफ मान्यतेने रोटरी क्लब बेळगांव, बेळगाव स्पोर्ट्स क्लब, कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना, स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ कर्नाटक, बेळगांव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने 16 व्या वरिष्ठ पुरुष व महिला व महिला मॉडल फिजिक राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आयबीबीएफचे पदाधिकारी बेळगांवात दाखल झाले आहे.
या यासाठी भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष स्वामी रमेश कुमार, पद्मभूषण मिस्टर युनिव्हर्स प्रेमचंदडिग्रा, व जागतिक शरीर सौष्ठव संघटनेचे सचिव चेतन पठारे. तळवळकर यांचे मालक मधुकर तळवळकर अर्जुन पुरस्कार विजेते टीव्ही पॉली भास्करन आठ वेळा जागतिक विजेते बॉबी सिंह तुलसी सुजन नवनीत सिंह,हिरेल शेठ या मान्यवरांचे आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्धण्णावर व या स्पर्धेचे ब्रँड अँबेसेडर सुनील आपटेकर यांनी सर्व मान्यवरांचे हॉटेल सन्मान येथे स्वागत केले.
सदर स्पर्धेत देशभरातील अव्वल 450 हून अधिक पुरुष शरीरसौष्ठवपटू व 45 हून अधिक महिला खेळाडू व 200 पंच सहभागी होणार आहेत.
आयबीबीएफच्या नियमानुसार 10 वजनी गटात ही स्पर्धा होणार आहे मंगळवार तारीख 14 रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून या स्पर्धेचे रजिस्ट्रेशन होणार आहे यानंतर सायंकाळी 6.00 वाजता अन्नोउत्सव येथे सहभागी खेळाडू व पंथसंचालन करणार असून यानंतर बुधवारी या स्पर्धेची पात्रता फेरी व गुरुवार तारीख 16 रोजी अंतिम फेरी असणार आहे.
या स्पर्धेत देशातील नामवंत खेळाडू रेल्वेचा रामनिवास ,हरिभाऊ, श्रीराम, तर 13 वर्षानंतर महाराष्ट्राचा शशांक वाकडे मिस्टर युनिव्हर्स चित्रेश नेटेशन, जागतिक विजेता सर्वानमणी, मिस्टर युनिव्हर्स कार्तिकेश्वर हे नामवंत खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.