बेळगाव लाईव्ह :इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन (आयबीपीएफ) आणि कर्नाटक राज्य बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्यावतीने बेळगाव मध्ये येत्या 14 ते 16 जानेवारी 2025 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील 16 व्या वरिष्ठ पुरुष आणि महिला राष्ट्रीय शरीर सौष्ठव अजिंक्यपद स्पर्धा -2025 साठी ऑल इंडिया पोलीस फोर्स कंट्रोल बोर्डने आपल्या शरीर सौष्ठवपटूंच्या संघाची घोषणा केली आहे.
ऑल इंडिया पोलीस फोर्स कंट्रोल बोर्डने बेळगावमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील 16 व्या वरिष्ठ पुरुष व महिला शरीर सौष्ठव अजिंक्यपद स्पर्धा -2025 साठी आपला 12 शरीर सौष्ठवपटूंचा संघ निश्चित केला आहे. दोन महिलांचा समावेश असणाऱ्या या संघातील शरीरसौष्ठवपटूंची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
पुरुष : संतोष केआर. बोबोंगा -झारखंड पोलीस (55 किलो गट), एल. ओकेंद्र सिंग -मणिपूर पोलीस (60 किलो गट), रेशीपाल सिंग -सीआयएसएफ (65 किलो गट), केएसएच अरुणजीत मिटाई -मणिपूर (70 किलो गट), गुनाव लुवांगथम -सीआरपीएफ (75 किलो गट), अजय रावत -एमपी पोलीस (80 किलो गट),
राकेश कुमार -हरियाणा पोलीस (85 किलो गट), एन. जी. सुरचणरा सिंग -मणिपूर पोलीस (90 किलो गट), एल. प्रेमजीत सिंग -सीआरपीएफ (100 किलो गट), हार्दिक सिंग -पंजाब (100 किलो वरील गट). महिला : संजीव कुमार -राजस्थान पोलीस (55 किलो खालील गट), सुनैना डोंगरे -महाराष्ट्र पोलीस (55 किलो वरील गट).
दरम्यान, बेळगाव होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशातील कांही मातब्बर शरीर सौष्ठवपटूंनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मिस्टर वर्ल्ड रवींद्र मलिक आणि आंतरराष्ट्रीय महिला शरीर सौष्ठवपटू गतविजेत्या गीता सैनी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मी इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनचा ॲथलेट असल्याचा मला अभिमान आहे असे सांगितले.
येत्या 14 ते 16 जानेवारी 2024 या कालावधीत बेळगाव, कर्नाटक येथे 16 व्या वरिष्ठ राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करत असल्याबद्दल त्यांनी आयबीबीएफ आणि कर्नाटक बॉडी बिल्डर्स असोसिएशनला धन्यवाद देण्याबरोबरच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या भव्य स्पर्धेसाठी 25 लाख रुपयांची बक्षिसे पुरस्कृत केल्याबद्दल कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना आपला सलाम असल्याचे म्हंटले आहे. मागील वर्षाप्रमाणे 2025 मध्ये देखील या स्पर्धेचे अजिंक्यपद (टायटल) माझ्याकडेच अबाधित राहील या ध्येयाने मी पूर्ण क्षमतेने या स्पर्धेत सहभागी होणार असून माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करणार आहे.
शरीर सौष्ठव सारख्या विस्मयकारक खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी निष्ठेने कठीण परिश्रम घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्दन्नावर, आयबीबीएफचे अध्यक्ष स्वामी रमेश कुमार व सरचिटणीस चेतन पठारे यांना खास धन्यवाद असे सांगून मिस्टर वर्ल्ड रवींद्र मलिक व गतविजेती गीता सैनी यांनी आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडाप्रेमींनी बहुसंख्येने या स्पर्धेला उपस्थित राहून ती यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे मिस्टर वर्ड अनुज तालियान आणि सेंट्रल रेव्हेन्यू स्पोर्ट्स अँड कल्चरल बोर्डच्या संजना यांनी देखील वरील प्रमाणेच आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.