हिडकलचे पाणी धारवाडच्या उद्योगांकडे वळवण्यास खा. शेट्टर यांचा विरोध

0
2
Shetter
 belgaum

बेळगाव लाईव्ह:हिडकल जलाशयातून धारवाड येथील औद्योगिक वसाहतीला पाणी नेण्यासाठी पाटबंधारे खात्याकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही, अशी माहिती बेळगावचे खासदार व माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिली.

हिडकलच्या पाण्यासंदर्भात माजी महापौर शिवाजी सुंठकर व माजी नगरसेवक दीपक वाघेला यांनी काल गुरुवारी खासदार शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. खासदार जगदीश शेट्टर यांनी कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळाने (केआयएडीबी) हा प्रकल्प मांडला होता.

परंतु पाटबंधारे विभागाने त्याला मान्यता दिली नव्हती असे स्पष्ट करून त्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शवत बेळगाववासीयांनी सदर योजनेला विरोध न केल्यास या प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला.

 belgaum

हिडकलचे 0.58 टीएमसी पाणी राज्य सरकारच्या मान्यतेशिवाय धारवाडला दिले जात असल्याच्या वृत्तावरून हा वाद निर्माण झाला आहे. मूळचे हुबळी येथील परंतु सध्या बेळगावचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या शेट्टर यांनी अधिकृत मंजुरीशिवाय सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

परवानगी नसतानाही हिडकल ते धारवाडपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाल्याचे वृत्त आहे. खासदार शेट्टर यांनी पाटबंधारे विभागाकडून खुलासा मागितल्यानंतर त्या कामाला कोणतीही अधिकृतता देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे बेळगाववासीयांचा याला किती कडाडून विरोध होतो, यावर आता या योजनेचे भवितव्य अवलंबून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.