बेळगाव लाईव्ह : तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व युवा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावमध्ये रविवार, १२ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता मराठा सांस्कृतिक भवन, महात्मा जोतिबा फुले रोड, शहापूर-बेळगाव येथे “चलो बेळगाव युवा मेळावा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यात प्रख्यात वक्ते आणि मान्यवर सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार रोहित आर. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल.
या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध वक्ते, इतिहासकार आणि लेखक प्रा. मधुकर पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
हा मेळावा मराठी तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली असून सर्व मराठी बांधव आणि तरुणांनी या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.