Sunday, January 5, 2025

/

युवा मेळाव्याला कुद्रेमानी, बाची, तुरमुरीतून पाठिंबा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीच्या वतीने होऊ घातलेल्या युवा मेळाव्यासाठी जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. युवा आघाडीचा युवा मेळावा 12 जानेवारी रोजी होणार आहे.

या मेळाव्याला कुद्रेमानी, बाची आणि तुरमुरी येथून पाठींबा देण्यात आला आहे. तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किनयेकर यांनी युवा मेळावा यशस्वी करण्यासाठी कंबर कसली असून गावागावी जनजागृतीचा सपाटा लावला आहे.

युवा मेळाव्याच्या जागृतीसाठी बुधवारी रात्री युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी जागृती करण्यास सुरवात केली आहे. कुद्रेमानी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात बैठक झाली. यावेळी तालुक्यातील सर्व मराठी तरूण एकवटून लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी 12 जानेवारी रोजी युवा आघाडीतर्फे युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.Mes taluka

या मेळाव्यात महाराष्ट्रातील नेते आणि व्याख्याते मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे सीमाभागातील सर्व तरुणांनी मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष राजू किणयेकर यांनी केले. या मेळाव्याला सर्वांनी एकमुखी पाठींबा दिला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य शांताराम पाटील, शिवाजी मुरकुटे, समितीचे सहसचिव मल्लाप्पा गुरव, नागेश किल्लेकर, युवा आघाडी सचिव शंकर कोनेरी, महादेव गुरव, अर्जुन जांबोटकर, मल्लाप्पा पाटील, नागेश राजगोळकर, दत्ता कांबळे, परशराम पाटील, राजाराम राजगोळकर, मोहन शिंदे, संतोष धामणेकर, विलास गुरव आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.