बेळगाव मनपा अर्थसंकल्पपूर्व सभेत महापौरांनी जाणून घेतले जनतेचे मत

0
3
 belgaum

बेळगाव लाईव्ह : :बेळगाव महानगरपालिकेच्या सभागृहात अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत सभा गुरुवारी पार पडली. महापौर सविता कांबळे यांनी जनतेचे सल्ले ऐकून घेतले. यावेळी अनेक मुद्द्यांवरून नाराजी व्यक्त करण्यात आली.

यावेळी माजी महापौर विजय मोरे यांनी महापालिकेने गेल्या दहा वर्षांत सार्वजनिक सल्ल्यांची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप केला. बजेट फक्त महापालिका अधिकारी व लोकप्रतिनिधींनी आपल्या सोयीने तयार करून सरकारकडे पाठवले जाते. वेळेत सभा न घेणे म्हणजे नागरिकांचा अपमान आहे, असे त्यांनी नमूद केले.

भाजपचे नगरसेवक हनुमंत कोंगाळी यांनी, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांची माफी मागावी, अशी मागणी केली. तर वाल्मिकी समाजाचे नेते राजशेखर तळवार यांनी दलित व मागासवर्गीयांसाठी विशेष तरतूद करावी आणि गरिबांसाठी घरे बांधून द्यावीत, अशी विनंती केली. पत्रकार मेहबूब मकानंदार यांनी पत्रकारांसाठी वार्षिक तीन लाखांच्या विमा योजनेची मर्यादा पाच लाखांवर वाढवण्याची मागणी केली. तसेच हिडकल जलाशयाचा पाणी पुरवठा धारवाडच्या औद्योगिक क्षेत्राला नेण्याची योजना बंद केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

 belgaum

दलित नेते मल्लेश चौगुले यांनी, महापालिकेच्या क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांकडून नियमित कर गोळा केला जावा, अशी सूचना केली. नामनिर्देशित सदस्य दिनेश नाशिपुडी यांनी, महापालिकेच्या व्यापारी भागातील मालमत्तांमधून योग्य कर वसुली केली तर उत्पन्न दुप्पट होईल, असे मत व्यक्त केले.

या सभेला उपमहापौर आनंद चव्हाण, आयुक्त शुभा बी., उदयकुमार तळवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.