बेळगाव लाईव्ह :नवी दिल्ली, 21-23 फेब्रुवारी 2025: 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले असून, या संमेलनात छत्रपती संभाजी महाराज विचार पिठाच्या माध्यमातून नवोदित कवींना आपली कविता सादर करण्याची सुवर्णसंधी दिली जाणार आहे.
नवोदित कवींना राष्ट्रीय व्यासपीठावर स्वतःला सादर करण्यासाठी ही एक अनोखी संधी आहे. या कार्यक्रमासाठी पुणे ते दिल्ली (दि. 19 फेब्रुवारी) व दिल्ली ते पुणे (दि. 23 फेब्रुवारी) या प्रवासाचे ट्रेन बुकिंग फक्त ₹1500/- मध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. सहभागी कवींना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात येईल.
कार्यक्रमानंतर सर्व सहभागी कवी दि. 24 फेब्रुवारीला पुण्यात परततील.
इच्छुकांनी अर्ज करण्यासाठी संपर्क साधावा:
सीमाकवी रवींद्र पाटील,
राज्याध्यक्ष, अभामसा परिषद कर्नाटक
📞 9591929325
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जानेवारी 2025
नवोदित कवींसाठी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख प्रस्थापित करण्याची ही एक उत्तम संधी आहे. साहित्यप्रेमींनी आणि नवोदित कवींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.