लोकायुक्तांच्या धाडीमध्ये किती कोटींची संपत्ती जप्त

0
1
Lokayukta
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव लोकायुक्त पोलिसांनी प्रभारी उपनिबंधक सचिन मांडेद आणि पशु निरीक्षक संजय दुर्गन्नावर यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. बेहिशेबी मालमत्तेच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घरासह कार्यालयांवर धाड टाकण्यात आली. या कारवाईत तब्बल 3 कोटी 59 लाख 82 हजार 693 रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

लोकायुक्त पोलिसांनी शुक्रवारी सकाळीच बेळगाव उपनिबंधक कार्यालयाचे प्रभारी उपनिबंधक सचिन बसवंत मांडेद उर्फ मांडेदार आणि निलजी (ता. रायबाग) येथील पशु निरीक्षक संजय अण्णाप्पा दुर्गन्नावर यांच्या विरोधात एकाच वेळी धाडसत्र राबवले. भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढत असल्याने लोकायुक्तांनी ही कारवाई केली.

सचिन मांडेद यांच्या विरोधातील कारवाईत लोकायुक्त पोलिसांनी पाच ठिकाणी छापे टाकले. यामध्ये स्थावर मालमत्ता: जमीन – 2 लाख रुपये किमतीची एक जागा, घर (बांधकाम सुरू असलेले) – 50 लाख रुपये, 6 लाख रुपये किमतीची शेतजमीन – 1 एकर 12 गुंठे, तर जंगम मालमत्ता: रोख रक्कम – 1 लाख 35 हजार रुपये, सोने – 1 किलो 430 ग्रॅम (किंमत: 81,98,243 रुपये), चांदी – 5 किलो 571 ग्रॅम (किंमत: 5,29,316 रुपये), 2 लाख 50 हजार रुपये किमतीची वाहने, बँक ठेवी – 68 लाख रुपये, म्युच्युअल फंड्स – 18 लाख रुपये, इक्विटी शेअर्स – 15 लाख रुपये अशी एकूण 2 कोटी 19 लाख 179 रुपये जप्त करण्यात आलेली मालमत्ता आहे.Lokayukta

 belgaum

संजय दुर्गन्नावर यांच्या विरोधातील कारवाईत लोकायुक्त पोलिसांनी त्यांच्या घरासह तीन ठिकाणी शोधमोहीम राबवली. या छाप्यांमध्ये स्थावर मालमत्ता: चार प्लॉट्स – 4 लाख 77 हजार रुपये, घर – 42 लाख रुपये किमतीचे, 4 लाख रुपये किमतीची शेतजमीन, जंगम मालमत्ता : रोख रक्कम – 2,190 रुपये, सोने व चांदीचे दागिने – 99 लाख 92 हजार 324 रुपये, 4 लाख 50 हजार रुपये किमतीची वाहने, इतर जंगम मालमत्ता – 8 लाख 86 हजार रुपये, अशी 1 कोटी 40 लाख 82 हजार 514 रुपये इतकी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

लोकायुक्तांच्या धाडीमुळे बेळगाव परिसरात खळबळ उडाली आहे. प्रभारी उपनिबंधक आणि पशु निरीक्षक यांच्या भ्रष्टाचाराचे जाळे किती मोठे आहे, हे या छाप्यांमधून उघड झाले आहे. सदर प्रकरणी बेळगाव लोकायुक्त पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.