याबाबत खानापूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील देवलती येथील सोने व्यापारी ईरांना प्रल्हाद सूर्यवंशी यांचे श्री लक्ष्मी देवी ज्वेलर्स या नावाने सोन्याचे दुकान आहे. बुधवार दिनांक 29 रोजी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास, दुचाकीवरून दोघेजण सोने खरेदीच्या बहाण्याने सूर्यवंशी यांच्या दुकानात आले. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची चौकशी सुरू केली. वेगवेगळे दागिने पाहिले, काही दागिने पसंत केले. मात्र यावेळी चोरट्यांनी सूर्यवंशी यांचे लक्ष विचलित करून पाच तोळ्याचे दागिने लंपास करून पलायन केले.
चोरट्यानी आपल्या दुकानात चोरी केल्याचे काही वेळानंतर व्यापाऱ्याच्या लक्षात येताच, त्यांनी याबाबतची माहिती खानापूर पोलिसाना दिली. खानापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आणि सीसीटीव्ही च्या आधारे चोरट्यांचा तपास करण्यासाठी धारवाड पर्यंत पोलीस पथक रवाना झाले होते. मात्र पोलिसांच्या हाती काही लागले नाही.
खानापूर पोलीसात या गुन्ह्याची नोंद झाली असून, खानापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत. याच प्रकारे खानापूर शहरात गेल्या दीड महिन्यापूर्वी रेणुका ज्वेलर्स या दुकानातही मालकाचे लक्ष विचलित करून जवळपास चार तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडलेली आहे. या गुन्ह्यांची नोंद पोलीस स्थानकात झाली आहे. अशा अपरिचित ग्राहकांच्याबाबत सोने व्यापारानी दक्ष रहावेत असे आवाहान खानापूर पोलिसांनी केले आहे. देवलती येथे झालेल्या चोरीच्या तपासासाठी पथक निर्माण करण्यात आले आहे.
या पथकाने धारवाड पर्यंत तपास केलेला आहे. मात्र पोलिसांच्या हाती काही लागले नाही. शहरात अशा चोरट्यांचे मोठ्या प्रमाणात जाळे पसरले असून, सातत्याने सोनार दुकान व प्रवाशांच्या बॅगमधून सोने व पैसे लंपास करण्याच्या घटना खानापूर बस स्थानक, तसेच बाजारात वारंवार घडत आहेत.