बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील राखीव जंगलात कांही पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या रंगीत पार्टीची गंभीर दखल वन विभागाने घेतली असून चार जणांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला आहे.
या पद्धतीने कारवाई करण्याबरोबरच अभ्यागत पर्यटकांना जांबोटी जवळील वज्रपोहा धबधबा आणि भीमगड वन्यजीव अभयारण्य येथील निर्बंधांचा आदर करण्याची आणि पुढील सूचना मिळेपर्यंत या भागात प्रवेश टाळण्याचा सल्ला बेळगाव वनविभागाने दिला आहे.
खानापूर (जि. बेळगाव) तालुक्यातील भीमगड वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. वन्यजीव संरक्षण कायदा -1972 आणि केएफए -1963 नुसार तसे करणे दंडनीय आहे.
कायद्याचे उल्लंघन : कलम 27,30,31,32,51 आणि कलम 24(सी)(2) नुसार दंडनीय असून त्यासाठी 3 वर्षे कारावास, 1 लाख रुपये दंड आणि दोन्ही, अशी शिक्षा होऊ शकते.