Thursday, January 16, 2025

/

उद्याच्या हुतात्मा अभिवादन कार्यक्रमासाठी समितीचे आवाहन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे उद्या शुक्रवार दि. 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता कंग्राळी खुर्द येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सीमावासियांनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने हजर रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संयुक्त महाराष्ट्रासाठी बेळगाव येथे 17 जानेवारी 1956 रोजी झालेल्या सत्याग्रहात हुतात्मा झालेले कंग्राळी गावचे सुपुत्र पैलवान मारुती बेन्नाळकर व बाळू निलजकर यांना दरवर्षीप्रमाणे या यावर्षीही अभिवादन करण्यात येणार आहे.

शुक्रवारी सकाळी ठीक 8:30 वाजता कंग्राळी खुर्द येथे हा अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आवाहन केल्याप्रमाणे दुपारी ठीक 3 वाजता कोल्हापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयातील सीमा प्रश्नाच्या याचिकेबद्दल व सीमाप्रश्न लवकरात मार्गी लागावा यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.

त्यानंतर मराठा महासंघ यांच्यावतीने कोल्हापूर येथील बिंदू चौकामध्ये हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या अभिवादन व निवेदन देण्याच्या कार्यक्रमांना बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, घटक समितीच्या सदस्यांनी, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी,

युवा आघाडी व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी तसेच मराठी भाषिक सीमावासीयांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व चिटणीस ॲड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.