Tuesday, January 7, 2025

/

एचएमपीव्ही विषाणू बाबत उद्या मार्गदर्शक सूची

 belgaum

बेळगाव लाईव्ह: चीन देशात थैमान घातलेला एचएमपीव्ही या श्वसनाच्या आजाराशी संबंधित विषाणू बाबत देशात आरोग्य खात्याने मार्गदर्शक सूचना दिल्या असताना कर्नाटक आरोग्य खाते देखील याबाबत मार्गदर्शन करणार आहे.

बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून देखील सोमवारी याबाबत सूचना दिल्या जाणार आहेत.

सध्या चीनमध्ये Human Metapneumovirus(HPMV) उद्रेकझाल्याच्या बातम्या येत आहेत. मानवी मेटान्यमूोव्हायरस (एचएमपीव्ही) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम 2001 मध्ये नेदरलँड मध्ये आढळला होता.

मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास(सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातीला उद्भवतो. या अनुषंगाने डीजीएचएस आणि संचालक, एन सी डी सी, दिल्ली यांनी दि ३ जानेवारी २०२५ रोजी एक निवेदन प्रसिध्द केले आहे.कर्नाटकचे आरोग्य खाते असे देऊ शकते मार्गदर्शक तत्वे

हे करा :> जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.

> साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.

> ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.

> भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा

> संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.

हे करू नये :

➤ हस्तांदोलन

> टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर

> आजारी लोकांशी जवळचा संपर्क

➤ डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.

> सार्वजनिक ठिकाणी थुंकणे

> डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.