बेळगाव लाईव्ह :यापूर्वी चीनमध्ये उत्पत्ती झालेल्या कोरोना विषाणूने भारतासह जगभरात धुमाकूळ घातल्यानंतर आता चीनमधील आणखी एका महामारीच्या विषाणू कर्नाटकात सापडला आहे.
राजधानी बेंगलोर येथील एका अवघ्या 8 महिन्याच्या बालकांला त्याची लागण झाली असून ‘एचएमपीव्ही’ नांवाचा हा विषाणू प्रयोगशाळेमध्ये बालकाच्या रक्त तपासणी आढळून असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्याने दिली आहे. तथापि वैद्यकीय तज्ञ व आरोग्य खात्याने हा विषाणू तितकासा घातक नसल्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.
तीन वर्षांपूर्वी चीनमध्ये कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर भारतामध्ये कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण कर्नाटकातील कलबुर्गी येथे आढळून आला होता. त्यानंतर आता चीनमध्येच उत्पत्ती झालेल्या एचएमपीव्ही विषाणूची लागण झालेला देशातील पहिला रुग्ण पुन्हा कर्नाटकातच म्हणजे बेंगलोर येथे आढळून आला आहे.
अवघ्या 8 वर्षाच्या बालकांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे. सारखा ताप येत असल्यामुळे संबंधित बालकाला बेंगलोर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्रयोगशाळेमध्ये तापाचे कारण शोधण्यासाठी बालकाची रक्त तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये एचएमपीव्ही विषाणू सापडला आहे.
तथापि सदर विषाणूला घाबरण्याचे कारण नसले तरी मुले आणि वयोवृद्ध लोकांच्या बाबतीत अधिक खबरदारी घेतली जावी असे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले आहे. दरम्यान चीनमधील एचएमपीव्ही विषाणू राज्यात आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.