बेळगाव लाईव्ह :शांताई वृद्धाश्रम आणि यंग बेळगाव फाऊंडेशन यांनी मदनकुमार भैरप्पनवर यांच्या सहकार्याने हिंडलगा कारागृहातील महिला कैद्यांना साड्या आणि स्वेटर्सचे वाटप करून मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा केला.
संक्रांतीनिमित्त हिंडलगा कारागृहातील महिला कैद्यांना माजी महापौर विजय मोरे यांच्या पुढाकाराने साड्या व स्वेटर्सचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी हिंडलगा कारागृह अधीक्षक कृष्णा मुर्ती, डॉ. सरस्वती, कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते यंग बेळगाव फाउंडेशनचे ॲलन विजय मोरे, विनोद मोरे, अद्वैत चव्हाण-पाटील, आदी उपस्थित होते. माजी महापौर विजय मोरे यांनी सणासुदीच्या काळात कैद्यांना उबदार आनंद मिळावा या उद्देशाने संक्रांत सणाच्या निमित्ताने हा उपक्रम राबविला असल्याचे स्पष्ट केले.
काळजी आणि आधार म्हणून दिल्या गेलेल्या साड्या आणि स्वेटर्सच्या माध्यमातून सणादिवशी आपण कैद्यांना विसरलेलो नाही याची आठवण शांताई वृद्धाश्रम आणि यंग बेळगाव फाऊंडेशन यांनी करून दिली.
सदर दोन्ही संस्थांच्या कार्याचे कौतुक करून अधीक्षक कृष्णा मूर्ती आणि डॉ. सरस्वती यांनी सकारात्मकता आणि आशा पसरवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. साड्या आणि स्वेटर्स दिल्याबद्दल शेवटी कैद्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.