बेळगाव लाईव्ह :केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी घोषित केलेला बेळगाव शहरातील पहिला बहुचर्चित उड्डाणपूल प्रकल्प स्थानिक भाजपच्या नेत्यांमुळे रखडला आहे.
राज्य सरकारने केंद्राकडे अनेकदा विनंती करून देखील यावर प्रतिसाद नाही असे स्पष्टीकरण पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रजासत्ताक दिनी दिले.
राज्य सरकार हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाऊले उचलणार आहे. गरज भासल्यास बांधकामासाठी अंदाजे लागणारे 300 कोटी पैकी वार्षिक ₹100 कोटी रुपये राज्य सरकार देईल.
बेळगाव उड्डाणपूल प्रोजेक्ट:
बेळगाव शहराचा 4.50 किलोमीटरचा पहिला उड्डाणपूल, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे ,जो राष्ट्रीय महामार्ग-48 (NH-48) ते कित्तूर राणी चन्नम्मा सर्कलपर्यंत विस्तारेल आणि डॉ. आंबेडकर रोड आणि KLE हॉस्पिटल मार्गे NH कडे जाईल.
शहरातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्याचा या उड्डाणपुलाचा उद्देश आहे . स्थानिक भाजप कडून विरोध होत असल्याने हा प्रकल्प रखडला असल्याचे जारकीहोळी यांनी म्हंटले आहे.