बेळगाव लाईव्ह :पास व पर्मिट नसताना गोवा राज्यातील दारू व बिअर बॉटल ची सहाचाकी गुड वाहनातून विकण्यासाठी म्हणून घेऊन जाताना बेळगांव जांबोटी हायवे रोडवर पोलिस व इतर स्टाफ मिळून येणाऱ्या गाड्यांची तपासणी करत असताना रंगे हात सापडलेल्या आरोपींची साक्षीदारातील विसंगती व सबळ पुराव्या अभावी येथील तिसरे जे. एम. एफ. सी. न्यायालयाचे न्यायादिशानी सदरी आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
निर्दोष मुक्तता केलेल्या आरोपींचे नांवे: 1) शंकर लक्ष्मण पवार, वय वर्षे 45, रा कुरबर गल्ली,
नंदीहळ्ळी, तालुका व जिल्हा बेळगांव. 2) सुरेश परशूराम शिंदे, वय वर्षे : 50,रा : विनायक नगर, हिंडलगा, तालुका व जिल्हा बेळगांव अशी आहेत.
दक्षिण वलय अबकारी पोलिस ठाणाचे पी. एस. आय. प्रतिभा हितलमणी यांनी दिलेल्या फिर्यादी वरूनतारीख : 27-10-2018 रोजी दुपारी 1.30 वाजता फिर्यादी व इतर पोलिस स्टाफ खात्री दायक बातमी मिळाल्या प्रमाणे बेळगांव तालुक्यातील किणये बस स्टैंड पासून एक किलो मीटर अंतरावरील जांबोटी बेळगांव हायवे रोड वर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना टाटा गुड वाहन नं. के. ए. 22 बी. 4646, या वाहणांची तपासणी केली तपासणी करत असताना गुड्स गाडी मध्ये गोवा राज्यातील दारू बॉटल (1) रॉयल स्ट्राग विस्कीची 12 बॉटल (एकूण 9 लिटर) व (2) किंग फीशर स्ट्रांगची 24 बॉटल (एकूण 12 लिटर) असे गाडीत सापडले होते.
गाडीमधील सदरी वरील आरोपी यांच्याकडे पास व पर्मीटबद्दल चौकशी केली असता. त्यांच्याकडे आढळले नाही म्हणून 2 पंचासमक्ष सदरी वाहन व दारू व बीर बॉटल च पंचनामा करून जप्त करण्यात आले होते
त्यानंतर सदरी आरोपीवर अबकारी कायदा कलम 10, 11, 12, 14, 15, 32 (1), 34, 38 (ए), 43 प्रकारे गुन्हा दाखल करून सदरी आरोपींना अटक करून त्यांना न्यायलयात हजर करण्यात आले होते त्यानंतर सदरी गुन्हांचा तपास करून सदरी आरोपीं विरूध्द न्यायलयात दोषारोप दाखल करण्यात आले होते.आरोपींच्या वतीने अॅड. मारूती कामाण्णाचे यांनी काम पाहीले.