बेळगाव लाईव्ह :गांधीनगर परिसरातील मारुतीनगर पहिला क्रॉस या गल्लीचा एका बाजूचा रस्ता संपूर्णपणे सांडपाण्याखाली अदृश्य झाला असल्यामुळे स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होत असून महापौर व महापालिका आयुक्तांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.
गांधीनगर येथील मारुतीनगर पहिला क्रॉस या गल्ली या रस्त्यावरील गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावर आले आहे. हे सांडपाणी इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले आहे की गल्लीचा बाजूचा रस्ता संपूर्णपणे सांडपाण्यात बुडाला आहे.
परिणामी अस्वच्छता आणि दुर्गंधीचे वातावरण निर्माण होण्याबरोबरच या रस्त्यावरील रहदारी ठप्प झाली आहे. परिणामी स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
या संदर्भात नागरिकांनी संबंधित अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचून राहिलेल्या सांडपाण्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तरी महापौर आणि महापालिका आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्याची समस्या निकालात काढण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, जोरदार मागणी मारुतीनगर पहिला क्रॉस येथील रहिवाशांकडून केली जात आहे