बेळगाव लाईव्ह :काँग्रेस पक्षातर्फे बेळगाव शहरामध्ये उद्या मंगळवार दि. 21 जानेवारी रोजी आयोजित राष्ट्रपिता म. गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि ‘जय बापू, जय भीम, व जय संविधान’ मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे आज सोमवारी सायंकाळी शहरात आगमन होणार असून त्यांचे प्रवासाचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
एच. ए. एल. विमानतळ, बेंगळूर येथून आज सायंकाळी 4 वाजता व्हीटी -पीव्हीके विशेष विमानाने बेळगावकडे प्रस्थान आणि सायंकाळी 4:45 वाजता बेळगावच्या सांबरा विमानतळावर आगमन.
उद्या मंगळवार दि. 21 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता महात्मा गांधीजी यांनी 1942 सालच्या स्वातंत्र्य संग्रामाला चालना देणाऱ्या ऐतिहासिक बेळगाव काँग्रेस अधिवेशनाच्या भूषविलेल्या अध्यक्षपदाच्या शताब्दी उत्सवाचा भाग म्हणून बेळगाव सुवर्ण विधानसौध आवारात कर्नाटक सरकार आणि जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला उपस्थिती.
त्यानंतर दुपारी 12 वाजता ‘गांधी भारत’ स्मरणार्थ क्लब रोड, बेळगाव येथील सीपीएड मैदानावर आयोजित ‘जय बापू, जय भीम व जय संविधान’ या भव्य काँग्रेस मेळाव्याला हजेरी. मेळाव्याच्या समारोपानंतर सायंकाळी 5 वाजता सांबरा विमानतळावरून व्हीटी -पीव्हीके विशेष विमानाने बेंगलोरकडे रवाना आणि सायंकाळी 5:45 वाजता बेंगलोरच्या एच. ए. एल. विमानतळावर आगमन.