Monday, January 20, 2025

/

पतीच्या अत्याचाराला कंटाळलेल्या पत्नीने केली पतीची निर्घृण हत्या

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील उमराणी येथे एका महिलेने आपल्या पतीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे दोन तुकडे करून बॅरलमधून नेल्याचा भीषण प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडवली असून सदर महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी कि, बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील उमराणी गावात श्रीमंत इटनाळे आणि सावित्री इटनाळे हे दाम्पत्य आपल्या मुलांसमवेत राहात होते. सावित्रीला तिचा पती वारंवार त्रास देत होता.

पतीच्या सततच्या त्रासामुळे संतप्त झालेल्या सवित्रीने मुलं झोपल्यानंतर श्रीमंत याच्या डोक्यात दगडाने वार करून त्याला ठार केलं. मृतदेह घरात ठेवण्याचे धाडस न झाल्याने सवित्रीने मृतदेहाचे दोन तुकडे केले. तुकडे एका लहान बॅरल मध्ये ठेवून शेजारच्या शेतात नेऊन टाकले.

अत्यंत क्रूरपद्धतीने आपल्या पतीची हत्या केलेल्या सावित्रीने शिताफीने मृतदेहाचे तुकडे शेतात नेऊन टाकत वापरलेला बॅरल पुन्हा स्वच्छ करून विहिरीत फेकला. यासोबतच हत्येसाठी वापरलेली शस्त्रे आणि रक्‍ताळलेले कपडे देखील एका पिशवीत बांधून विहिरीत टाकले. हे साहित्य पाण्यावर तरंगू नये याची खबरदारी घेत यासोबतच दगड देखील तिने बांधला.

तिच्या क्रौर्याची मर्यादा इतकी होती की रक्‍त पडलेले ठिकाण साफ करून तिने या सर्व घडामोडीदरम्यान वापरलेले आपले कपडेही जाळून टाकले. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला दगड शेडमध्ये लपवून आपल्या पतीचा मोबाइलदेखील स्विच ऑफ केला. यासर्व घटनेदरम्यान झोपेतून जागे झालेल्या मोठ्या मुलीला याची वाच्यता कुठेही न करण्याची ताकीद दिली. हा थरार असाच सुरु ठेवत सर्व पुरावे नष्ट करूनही सावित्री इटनाळे या महिलेला अखेर पोलिसांनी अटक केली.

घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, सवित्रीवर संशय आला. पोलिसांनी चौकशीदरम्यान सवित्रीने पतीच्या हत्या करण्याची कबुली दिली. तिच्या मते, पती सतत पैसे, दुचाकी मागत होता आणि मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता.

या प्रकाराने संतापलेल्या सवित्रीने हा निर्णय घेतला असल्याचे तिने पोलीस चौकशीत सांगितले आहे. फिल्मी स्टाईलने करण्यात आलेल्या या हत्येच्या घटनेने खळबळ माजली असून घटनेचा थरार ऐकून धक्का बसत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.