Friday, March 14, 2025

/

नाल्यातील विषारी सांडपाण्यामुळे ‘या’ वसाहतींचे आरोग्य धोक्यात

 belgaum

बेळगाव लाईव्ह :केमिकल फॅक्टऱ्यांकडून नाल्यात सोडल्या जाणाऱ्या रसायन युक्त सांडपाण्यामुळे पिरनवाडीसह महावीरनगर, देवेंद्रनगर व ब्रह्मनगर या वसाहतींमधील वातावरण दूषित होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी त्रस्त नागरिकांनी केली असून आंदोलनाची तयारी चालवली आहे.

उद्यमबाग आणि परिसरातील औद्योगिक वसाहती मधील केमिकल उद्योग समूहाचे टाकाऊ रसायन युक्त प्रचंड दर्प असलेले सांडपाणी पिरनवाडी गावच्या नाल्यात सोडण्यात येते. नाल्यातून सतत वाहणाऱ्या या विषारी दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे पिरनवाडीसह महावीरनगर, देवेंद्रनगर व ब्रह्मनगर या वसाहतींमधील वातावरण दूषित झाले आहे. हे सांडपाणी जमिनीत झिरपून या वसाहतींमधील विहिरींचे पाणी प्रदूषित झाले आहे.

शुद्ध हवे ऐवजी नाल्यातील सांडपाण्याचा उग्र विषारी रासायनिक दर्प रात्रंदिवस वातावरणात पसरलेला असल्यामुळे सदर वसाहतींमधील लहान मुले व वयोवृद्ध नागरिक आजारी पडू लागली आहेत. एवढेच नव्हे तर हवेतील रासायनिक अंशामुळे तर घराघरातील देव्हाऱ्यात असलेल्या चांदीच्या मूर्ती आणि भांडीकुंडी काळ्याकिट्ट पडल्या आहेत. बाहेरील दूषित हवा घरात येऊ नये म्हणून महावीरनगर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्रॉस येथील नागरिकांना गेल्या महिन्याभरापासून आपल्या घरांचे दरवाजे बंद ठेवावे लागत आहेत.Chemical

नाल्यातून वाहणाऱ्या रसायन युक्त सांडपाण्याच्या समस्येसंदर्भात पिरनवाडीसह महावीरनगर, देवेंद्रनगर व ब्रह्मनगर या वसाहतींमधील त्रस्त नागरिकांनी आज बुधवारी सकाळी जोरदार आवाज उठवला.

सदर समस्येसंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना पिरनवाडीचे माजी ग्रा. पं. अध्यक्ष राकेश तलवार यांनी उपरोक्त माहिती दिली. तसेच विषारी दर्प असलेल्या रसायनयुक्त सांडपाण्याची ही समस्या जर आणखी महिनाभर अशीच राहिली तर या ठिकाणच्या लोकांना जगणे मुश्किल होणार आहे.

त्यांच्यावर आपली घरे सोडून स्थलांतरित होण्याची वेळ येणार आहे असे स्पष्ट करून तरी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रसायन युक्त सांडपाण्याची ही समस्या तात्काळ निकालात काढावी आणि येथील रहिवाशांचे जगणे सुसह्य करावे, अशी मागणी राकेश तलवार यांनी केली. याप्रसंगी सचिन राऊत, आनंद पुजारी, अनिल मलानी, अशोक भाटे, सागर सोळंकी, प्रदीप राऊत, शांताराम तलवार, चौगुले आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.