Thursday, January 30, 2025

/

‘बीम्स’मध्ये आणखी एका बाळंतीनीचा आकस्मिक मृत्यू!

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बाळंतीनींच्या आकस्मिक मृत्यूमुळे निर्माण झालेली वादग्रस्तता निवळत असताना बेळगावच्या बीम्स हॉस्पिटलमध्ये आज मंगळवारी सकाळी पुन्हा एका बाळंतिणीचा मृत्यू झाल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

मुलीला जन्म दिल्यानंतर सदर बाळंतीण मृत्युमुखी पडली असून तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मयत बाळंतिणीचे नांव अंजली पाटील (वय 31 वर्षे) असे आहे. बेळगाव तालुक्यातील निलजी गावची रहिवासी असलेल्या अंजली हिला प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे घरच्यांनी काल सोमवारी सायंकाळी तिला बीम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.Bims women death

 belgaum

त्यानंतर हॉस्पिटलमध्ये प्रसुतीही झाली आणि अंजली पाटील हिने कन्यारत्नाला जन्म दिला. मात्र त्यानंतर अचानक तिची प्रकृती ढासळून त्यातच तिचे निधन झाले. काल धडधाकट असलेली अंजली अचानक मृत्युमुखी पडल्याने पाटील कुटुंबीयांवर मोठा आघात होऊन दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यामुळे दुःख अनावर झालेले पाटील कुटुंबीय बीम्स हॉस्पिटलमधील बाळंतीन विभागाच्या ठिकाणी आक्रोश करताना दिसत होते. दरम्यान बीम्स हॉस्पिटलमध्ये पुन्हा एका बाळंतिणीचा मृत्यू झाल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.