बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहरातील कॅपिटल वन सोसायटीतर्फे आयोजित कॅपिटल वन करंडक भव्य एकांकिका स्पर्धा नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेतील सांघिक प्रथम पारितोषिकासह उत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे पारितोषिक फोर्थ वर्ल्ड इचलकरंजीच्या ‘लॉटरी’ या एकांकिकेने पटकावले. या खेरीज स्पर्धेतील उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार परिवर्तन कला फाउंडेशन कोल्हापूरच्या गंधार जोग (कलम 375) याने, तर उत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार फोर्थ वाॅल थिएटर इचलकरंजीच्या मानसी कुलकर्णी (लॉटरी) हिने हस्तगत केला.
गेले 2 दिवस सुरू असलेल्या कॅपिटल वन करंडकासाठीच्या एकांकिका स्पर्धेचा बक्षीस समारंभ ज्येष्ठ रंगकर्मी श्रीमती वंदना गुप्ते व प्रसाद पंडित यांच्या उपस्थितीत पार पडला. बेळगावमध्ये सातत्याने 13 वर्षे सुरू असलेल्या या स्पर्धेबद्दल समाधान व्यक्त करून आपल्या खुमासदार शैलीत बोलताना अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रसाद पंडित, संस्थेचे चेअरमन शिवाजी हंडे व व्हा.चेअरमन शाम सुतार उपस्थीत होते. एकांकिका स्पर्धेच्या बक्षीस समारंभास संस्थेचे संचालक संजय चौगुले, रामकुमार जोशी, शिवाजी अतिवाडकर, शरद पाटील, सदानंद पाटील, भाग्यश्री जाधव, नंदा कांबळे सांस्कृतिक दालनाचे सुभाष सुंठणकर, संस्थेचे कर्मचारी पिग्मी संकलक व मोठ्या संख्येने नाट्यरसिक उपस्थीत होते.
कॅपिटल वन करंडक एकांकिका स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे. उत्कृष्ट नेपथ्य : टीम -स्पॉटलाईट कोल्हापूर, एकांकिका -वर्दी, तंत्रज्ञ ओंकार पाटील. उत्कृष्ट वेशभूषा /रंगभूषा : अभय थिएटर अकादमी गोवा, एकांकिका -दशावतार, कलाकार अजय फोंडेकर. उत्कृष्ट पार्श्वसंगीत : परिवर्तन कला फाउंडेशन कोल्हापूर, एकांकिका -कलम 375, कलाकार रमा घोलकर.
उत्कृष्ट प्रकाश योजना : गायन समाज देवल क्लब कोल्हापूर, एकांकिका -ऑल मोस्ट डेट, कलाकार अर्जुन संपत पिसाळ. उत्कृष्ट अभिनेत्री : फोर्थ वाॅल थिएटर इचलकरंजी, एकांकिका -लॉटरी, कलाकार मानसी कुलकर्णी. उत्तेजनार्थ रंग यात्रा नाट्यसंस्था इचलकरंजी, एकांकिका -चरचरणाऱ्या फॅटसीचे युद्ध, कलाकार मिलन डिसोजा. उत्कृष्ट अभिनेता : परिवर्तन कला फाउंडेशन कोल्हापूर, एकांकिका -कलम 375, कलाकार गंधार जोग. उत्तेजनार्थ : टीम स्पोटलाईट कोल्हापूर, एकांकिका -वर्दी, कलाकार विकास कांबळे.
उत्कृष्ट दिग्दर्शन : फोर्थ वॉल थिएटर इचलकरंजी, एकांकिका -लॉटरी, दिग्दर्शक निखिल शिंदे. उत्तेजनार्थ : गायन समाज देवल क्लब कोल्हापूर, एकांकिका -ऑल मोस्ट डेड, दिग्दर्शक प्रमोद पुजारी. सांघिक पारितोषिके : प्रथम क्र. -फोर्थ वॉल थिएटर इचलकरंजी (एकांकिका -लॉटरी) द्वितीय क्र. -गायन समाज देवल क्लब कोल्हापूर (एकांकिका -ऑल मोस्ट डेड),
तृतीय क्र. -रंग यात्रा नाट्य संस्था इचलकरंजी (एकांकिका -चरचरणाऱ्या फॅटसीचे युद्ध), उत्तेजनार्थ -टीम स्पॉटलाईट कोल्हापूर (एकांकिका -वर्दी) आणि उत्तेजनार्थ बेळगाव विभाग : वरेरकर नाट्य संघ बेळगाव (एकांकिका -वि. सी. आर.). सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रवी दर्शन कुलकर्णी (कोल्हापूर), यशोधन गडकरी (सांगली) व केदार सामंत (कुडाळ) यांनी काम पाहिले