बेळगाव लाईव्ह :बेंगलोर येथील कॅम्पेगौडा बस स्थानकाच्या टर्मिनल 3 नजीक एपीएसआरटीसी बसने धडक दिल्याने रस्ता ओलांडणारा खानापूर तालुक्यातील एक युवक ठार झाल्याची घटना गेल्या सोमवारी रात्री घडली.
मयत दुर्दैवी युवकाचे नांव भूषण भावकाण्णा पाटील (वय 29, रा. चापगांव, ता. खानापूर) असे आहे. कांही कामानिमित्त बेंगलोरला गेलेला भूषण पाटील हा
सोमवारी रात्री 7:15 वाजण्याच्या सुमारास बेंगळूर येथील कॅम्पेगौडा बस स्थानकाच्या टर्मिनल 3 जवळ रस्ता ओलांडत असताना बस खाली सापडला.
मयत भूषण यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. सदर अपघाताची बेंगलोर येथील मॅजेस्टिक पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.