Monday, February 10, 2025

/

21 ला बेळगावात काँग्रेसचे ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ अधिवेशन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथे येत्या मंगळवार  21 जानेवारी 2025 रोजी ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ नावाचे सार्वजनिक अधिवेशन आयोजित केले जाणार असल्याची घोषणा कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने (केपीसीसी) केली आहे. या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे केंद्रीय नेते हजेरी लावणार आहेत.

मुळात 27 डिसेंबर 2024 रोजी नियोजित असलेला हा कार्यक्रम माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आला होता.

आता येत्या  21जानेवारी रोजी होणारे अधिवेशन म्हणजे 1924 मध्ये बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनातील महात्मा गांधींच्या ऐतिहासिक अध्यक्षपदाच्या शताब्दी उत्सवाचा एक भाग आहे.Jai bapu

केपीसीसीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी काल मंगळवारी एआयसीसीचे संघटनात्मक सचिव आणि खासदार के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेऊन कार्यक्रमाच्या तयारीबाबत चर्चा केली.

या दोन दिवसीय कार्यक्रमाचा उद्देश महात्मा गांधी, डॉ. बी. आर. आंबेडकर आणि संविधान यांच्या आदर्शांना आदरांजली अर्पण करणे, तसेच समकालीन काळात त्यांची प्रासंगिकता अधोरेखित करणे हा आहे.

बेळगाव येथील सुवर्णसौध येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे देखील अनावरण याच दिवशी होणार आहे त्यासाठी काँग्रेसचे दिग्गज नेते मंडळी बेळगाव येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.