बेळगाव लाईव्ह :बेळगावमध्ये 1924 साली महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सवाचा भाग म्हणून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज गुरुवारी सकाळी टिळकवाडी येथील वीरसौध येथे म. गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण करून त्यांना आदरांजली वाहिली.
शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने वीरसौध येथे निर्माण केलेल्या फोटो गॅलरीचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व इतर मान्यवरांनी वीरसौध वास्तूतील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या बैठ्या पुतळ्याला पुष्पदल अर्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी मंत्री एच. के. पाटील, एम. बी. पाटील, एच. सी. महादेवप्पा, लक्ष्मी हेब्बाळकर, शरण प्रकाश दर्शनपूर, के. एच. मुनियप्पा, आमदार असिफ (राजू) सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे,
माहिती खात्याचे सचिव कामेरी बी. बी., आयुक्त हेमंत निंबाळकर, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, माहिती खात्याचे संयुक्त संचालक मंजुनाथ डोळ्ळीन, उपसंचालक गुरुनाथ कडबुर आदी उपस्थित होते.