बेळगाव लाईव्ह : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस गाडीला घटप्रभा रेल्वे स्थानकावर थांबण्याचे आदेश दिल्याची माहिती राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी दिली.
नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेसला बेळगाव वगळता महाराष्ट्रातील मीरज आणि सांगली स्थानकावर थेट थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे.
घटप्रभा हे जिल्ह्यातील सर्वात मध्यवर्ती ठिकाण असून, अनेक तालुक्यांचे केंद्र आहे आणि अमृत भारत योजनेअंतर्गत नूतनीकरण केलेल्या रेल्वे स्थानकावर थांबण्याची परवानगी देण्याची विनंती करण्यात आली होती.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्याचे रेल्वेमंत्री व्ही. सोमन्ना आणि केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हादा जोशी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल या भागातील जनतेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
रेल्वे थांब्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी सांगितले.