बेळगाव लाईव्ह :राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील वाहनांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक समायोजन अर्थात रहदारी मार्गात थोडा बदल करण्यात आला आहे.
काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दीनिमित्त काँग्रेस आज 26 आणि उद्या 27 डिसेंबर रोजी काँग्रेस रोडवरील वाहतूक पुढील प्रमाणे वळविण्यात आली आहे : दुसरे रेल्वे गेट टिळकवाडी ते मराठा कॉलनी हा काँग्रेस रोड तात्पुरता बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनांनी गोवावेस सर्कल आणि आरपीडी मार्गाने पर्यायी मार्गाचा वापर करावा.
27 डिसेंबर रोजी प्रतिबंधित प्रवेश : चन्नम्मा सर्कल, क्लब रोड, गांधी सर्कल, शौर्य सर्कल, शक्ती पार्क आणि ग्लोबल थिएटर मार्गातून जाणाऱ्या मार्गावर केवळ संमेलनाला उपस्थित राहणाऱ्या वाहनांनाच परवानगी असेल.
अवजड वाहनांचे निर्बंध (26 आणि 27 डिसेंबर) : अधिवेशन संपेपर्यंत अवजड वाहनांना चारही दिशांनी शहरात प्रवेश करण्यास मनाई आहे.
नो पार्किंग झोन (26 आणि 27 डिसेंबर) : काँग्रेस रोड (चन्नम्मा सर्कल ते तिसरे रेल्वे गेट) आणि क्लब रोड (चन्नम्मा सर्कल ते गांधी सर्कल) या रस्त्यांवर पार्किंगला बंदी आहे.
खानापूर वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग: खानापूरहून काँग्रेस रोडने प्रवेश करणाऱ्या वाहनांनी तिसरे गेट रेल्वे फ्लायओव्हर, आरपीडी सर्कल, गोवावेस सर्कल, बँक ऑफ इंडिया सर्कल, एसपीएम रोड, भातकांडे स्कूल क्रॉस, व्हीआरएल लॉजिस्टिक आणि जुना पीबी रोड या मार्गाने जावे.
बेळगाव शहर ते खानापूर पर्यायी मार्ग : शहरातून खानापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी जुना पीबी रोड, व्हीआरएल लॉजिस्टिक, भातखंडे स्कूल क्रॉस, एसपीएम रोड, बँक ऑफ इंडिया सर्कल, गोवेज सर्कल, आरपीडी सर्कल आणि तिसरा गेट रेल्वे फ्लायओव्हर वापरणे आवश्यक आहे. चालकांना विनंती आहे की त्यांनी सुधारित मार्गांचे अनुसरण करावे आणि सुरळीत वाहतूक व्यवस्थापनासाठी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.