बेळगाव लाईव्ह : स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळविलेल्या बेळगाव व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा बेळगाव सुवर्णसौध येथे सत्कार समारंभ आयोजिण्यात आला होता. या कार्यक्रमास जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांची उपस्थिती होती.
सन 2024 मध्ये बेळगाव दक्षिण व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील शासकीय उच्च माध्यमिक शाळा व निवासी शाळांमध्ये शिकणाऱ्या 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर अभिनव संकल्पना व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार स्पर्धात्मक वादविवाद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
इयत्ता 9वी आणि 10वीच्या विजेत्या विद्यार्थ्यांसाठी तालुका स्तरावर आहार आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने अभियोग्यता चाचणी घेण्यात आली होती. या स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सुवर्णसौध येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले, विद्यार्थ्यांमधील क्षमता ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असे कार्यक्रम वारंवार व्हायला हवेत. बाहेरील जग आणि त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत करणे यासाठी सतीश शुगर फाउंडेशनने यापूर्वीच अनेक शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. तर जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे म्हणाले की, स्पर्धेच्या युगात मुलांनी परिपक्व अवस्थेपासून तयारी केली तर अशा परीक्षांमुळे त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करता येईल.
यावली कार्यक्रमात यश मिळविलेल्या शंभर मुलांना प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात विधानपरिषदेचे सदस्य प्रकाश हुक्केरी, हनुमंत निरानी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, परिविक्षा अधिकारी दिनेशकुमार मीना, समाज कल्याण अधिकारी, सर्व स्तरावरील शिक्षण विभागाचे अधिकारी व विजेते स्पर्धक, शाळेचे मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते. चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याच्या उपसंचालक सीतारामन यांनी आभार मानले.