बेळगाव लाईव्ह : अनगोळ, भाग्यनगर येथील सह्याद्री कॉलनीतील महापालिकेच्या सीटीएस क्रमांक 4464 जागेचा सुरक्षेचा विषय उपस्थित झाला होता, ज्यात भू माफियांनी बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून या जागेवर अनधिकृत मालकी दाखल करण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणात श्रीराम सेना हिंदूस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडूसकर यांच्या नेतृत्वाखाली नागरीकांनी महापालिका आणि बुडा आयुक्तांची भेट घेतून गंभीर पाठपुरावा केला. यावेळी महापालिका आयुक्तांनी अधिकृत पत्रकाद्वारे ही जागा महापालिकेच्या मालकीची असून विविध विकास कामांसाठी आरक्षित असल्याचे जाहीर केले.
दरम्यान श्रीराम सेना हिंदूस्थानच्या युवा नेतृत्वाने तातडीने सिटी सर्व्हे ऑफिसकडे पाठपुरावा करून या अनधिकृत मालकीला स्थगिती दिली. अखेर त्या जागेवरील अनधिकृत नोंद नामंजूर करण्यात आली आहे, आणि या संदर्भातील आदेश पत्र देखील नागरीकांना सुपूर्द करण्यात आले आहे.
श्रीराम सेना हिंदूस्थानचे युवा नेतृत्व व अनगोळ विभाग अध्यक्ष उमेश कुऱ्याळकर यांनी या विषयात तातडीने लक्ष घालून सिटी सर्व्हे ऑफिसकडे या विषयाचा पाठपुरावा केला. अखेर या जागेवर अनधिकृत पणे नोंद करण्यात आलेली खासगी मालकी आता सीटीएस उताऱ्यावरून रद्द करण्यात आलेली आहे.
तशा आशयाचे आदेश पत्र देखील सीटीएस अधिकाऱ्यांकडून श्रीराम सेना हिंदूस्थानच्या प्रमुखांना व सह्याद्री कॉलनीतील नागरीकांना सुपूर्द करण्यात आलेले आहे.
जून 2023 पासून सुरू असलेल्या या संघर्षात श्रीराम सेना हिंदूस्थानच्या नेतृत्वाखाली सह्याद्री कॉलनीतील नागरीकांनी अतिक्रमणावर यशस्वीपणे नियंत्रण मिळवले आहे.