Wednesday, December 25, 2024

/

बेळगाव ग्रामीण मधील श्रीराम सैनिकांची अंजनीय पर्वताची वारी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने बेळगाव ग्रामीण मधील सुमारे 500 हून अधिक श्रीराम सैनिक तालुका अध्यक्ष भरत पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री प्रभू रामचंद्रांचे परमभक्त पवनपुत्र श्री हनुमान यांची जन्मभूमी अंजनांद्री पर्वताची वारी करण्यासाठी नुकतेच हम्पीच्या दिशेने रवाना झाले.

हम्पीच्या दिशेने रवाना होणाऱ्या सर्व श्रीराम सैनिकांना हार्दिक शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून श्रीराम सैनिकांना निरोप देण्यात आला. निरोप समारंभास श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, आपले ग्रामीण प्रमुख भरत पाटील, सचिन पाटील, दिलीप कोंडूसकोप, संदीप, राहुल या सर्वांच्या सहकार्यातून श्रीराम सेना हिंदुस्थानचे जवळपास 550 कार्यकर्ते अंजनेय पर्वताच्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी जात आहेत. श्री प्रभू रामचंद्रांचे परमभक्त पवनपुत्र श्री हनुमान यांचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या या सर्व कार्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा. सर्वांचा प्रवास सुखरूप होवो हीच प्रभू रामचंद्र आणि श्री पवनपुत्र हनुमान यांच्याकडे प्रार्थना. यावेळी बोलताना श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगाव तालुका (ग्रामीण) प्रमुख भरत पाटील यांनी गेल्या कांही दिवसांपासून बेळगाव ग्रामीण आणि शहर परिसरातील कार्यकर्त्यांची संपर्क साधून मी ही अंजनीय पर्वताची वारी आखली आहे अशी माहिती दिली. तसेच सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ही वारी आम्ही यशस्वी करणारा असल्याचे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

बेळगाव येथून हम्पी येथे असलेल्या अंजनेय पर्वत अर्थात अंजनांद्री बेट्ट या ठिकाणी पोहोचलेले श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते सवाद्य मिरवणुकीने महाबली श्री हनुमान यांच्या जन्मस्थानाचे दर्शन घेण्यासाठी रवाना झाले. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी एकाच पद्धतीचे कपडे घातले होते. अंगावर सफेद अंगरखा, भगवी लुंगी आणि गळ्यात भगवा शेला अशा पोशाखासह तेथील बाजारपेठेतून हातातील संघटनेचे भगवे ध्वज उंचावत, जय श्रीराम जय जय श्रीराम, बजरंगी बजरंगी हु हा, हु हा असा जयघोष करत ताशाच्या तालावर मिरवणुकीने निघालेले हे सर्व कार्यकर्ते साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.Anjani hill

अंजनेय पर्वतावरील श्री हनुमानाच्या जन्मस्थानाचे दर्शन घेतल्यानंतर सर्वांनी त्या ठिकाणी ‘राम, लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की’ असा टाळ्यांच्या गजरात कांही काळ जयघोष करून श्री हनुमंताचा आशीर्वाद घेतला.

एकंदर प्रभू श्रीरामचंद्र आणि श्री हनुमान यांच्या प्रति असलेल्या आपल्या गाढ श्रद्धेची प्रचिती आणून देणारे बेळगाव ग्रामीण मधील श्रीराम सेना हिंदुस्थानचे 500 हून अधिक कार्यकर्ते अंजनेय पर्वतावर दर्शनासाठी आलेल्या इतर भक्तांसाठी कुतूहलाचा विषय बनले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.