Thursday, December 19, 2024

/

व्ही. बी. किरण याने पटकावला ‘मि. सतीश शुगर -2024’ किताब

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्यावतीने बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या 11व्या सतीश शुगर क्लासिक -2024 या बेळगाव जिल्हा पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेतील ‘मिस्टर सतीश शुगर -2024’ हा मानाचा किताब (टायटल) ए. टी. फिटनेस जिमच्या व्ही. बी. किरण याने पटकावला. त्याचप्रमाणे स्पर्धेतील ‘बेस्ट पोझर’ किताबाचा मानकरी एस.एस.एस. फाउंडेशनचा उमेश गंगणे हा ठरला.

सतीश जारकीहोळी फाउंडेशनने बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन, गोकाक तालुका बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि चिकोडी तालुका बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित केलेली उपरोक्त स्पर्धा चिक्कोडी येथील आर. डी. हायस्कूल मैदानावर गेल्या सोमवारी सायंकाळी उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडली.

भारतीय शरीर सौष्ठव महासंघाच्या नियमानुसार विविध 7 वजनी गटांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील होतकरू शरीरसौष्ठवपटूंनी उस्फूर्त सहभाग दर्शवला होता. स्पर्धेतील टायटल विजेत्या ए. टी. फिटनेस जिमच्या व्ही. बी. किरण याला आकर्षक करंडकासह 1 लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे उपविजेत्या बेळगाव कॉर्पोरेशन जिमच्या प्रशांत खन्नूकर याला आकर्षक चषकासह 55 हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. बेस्ट पोझर किताब विजेत्या एस.एस.एस. फाउंडेशनच्या उमेश गंगणे याला चषक व 10 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

याव्यतिरिक्त प्रत्येक वजनी गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्या शरीर सौष्ठवपटूंना पदकांसह प्रत्येकी अनुक्रमे 10,000 रु., 9000 रु., 8000 रु., 7000 रु., आणि 6000 रुपयांचे बक्षीस देण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून महावीर मोहिते, डाॅ. प्रभाकर कोरे, शिवा पाटील, मांजरेकर, किरण रजपूत, अर्जुन नाईकवाडी, रियाज चौगुला आदी उपस्थित होते.Body buiding

त्याचप्रमाणे स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित सिद्दन्नावर, निळकंठ, जी.डी. भट, गंगाधर, हेमंत हावळ, रमेश कलमनी, कातेश गोकावी, सुनील पवार सुनील राऊत, अनंत लंगरकांडे, कावळे, सचिन मोहिते, नूर मुल्ला, अश्विन निंगन्नावर, शेखर जानवेकर, आकाश हुलीयार, असिफ कुसगल, शंकर पिलाई, सलीम गवर आणि कृष्णा चीचकतुंबल यांनी काम पाहिले.

11 व्या सतीश शुगर क्लासिक -2024 शरीर सौष्ठव स्पर्धेचा गटवार अंतिम निकाल (अनुक्रमे पहिल्या पाच क्रमांकाचे विजेते यानुसार) पुढीलप्रमाणे आहे. 55 किलो वजनी गट : गजानन गावडे (फिट प्रो), उमेश गंगणे (एसएसएस फाउंडेशन), सागर कळ्ळीमनी (कार्पोरेशन जिम), रोनक के. गवस (पी.के. फिट), संजयकुमार संगुनडी (व्ही.जे. फिट). 60 किलो गट : विशाल आर. निलजकर (बी स्ट्रॉंग), उदय मुरकुंबी (जय भारत आखाडा), मंजुनाथ कलघटगी (फ्लेक्स खानापूर), फिरोज वडगावकर (मॉर्डन), नितेश गोरल (पॉलिहाइड्रॉन). 65 किलो गट : मंजुनाथ सोनटक्की (एन एक्स टी लेवल), मंदार देसाई (आर.सी. फिटनेस), अविनाश परीट (सिद्धांत निपाणी), आफताब किल्लेदार (गोल्ड लाईफ), मंथन धामणेकर (स्नेहम टॅपिंग सर्व्हिस). 70 किलो गट : व्यंकटेश के. ताशिलदार (पॉलिहाइड्रोन), गणेश पाटील (संभाजी जिम), सुनील भातकांडे (पॉलिहाइड्रोन), मंजुनाथ आर. कोल्हापुरे (लाईफ टाईम फिटनेस), रितिक पाटील (रुद्रा).

75 किलो गट : प्रताप कालकुंद्रीकर (पॉलिहाइड्रॉन) राहुल कुलाल (एन एक्स टी फिट), विनीत हणमशेठ (राॅ फिट) विजय पाटील (फिट प्रो), मिलिंद कामटे (सिद्धांत निपाणी). 80 किलो गट : प्रशांत खन्नूकर (कॉर्पोरेशन जिम), गजानन काकतीकर (एसएसएस फाउंडेशन), आदित्य पाटील (बी स्ट्रॉंग जिम), संदीप पावले (मॉर्डन जिम), राहुल हिरोजी (युनिव्हर्सल जिम). 80 किलो वरील वजनी गट : व्ही. बी. किरण (ए.टी. फिट), महेश गवळी (रुद्रा), मोहम्मद साकिब डोंगरकी (सेव्हन स्टार), डेनिस मेंझीस (फ्लेक्स खानापूर), विक्रांत सातवणेकर (ऑलम्पिक).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.