Wednesday, December 4, 2024

/

महिला स्वसाहाय्य संघाच्या माध्यमातून शेकडो महिलांची फसवणूक : पालकमंत्र्यांकडे मागितली दाद

 belgaum

बेळगाव लाईव्ह : महिला स्वसाहाय्य संघाच्या माध्यमातून शेकडो महिलांची फसवणूक करणाऱ्या यल्लव्वा बन्नीबागी या महिलेविरोधात संतप्त महिलांनी आज पालकमंत्र्यांकडे दाद मागितली. महिला स्वसाहाय्य संघाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिलांची फसवणूक झाली असून फशी पडलेल्या महिलांचा आक्रोश लक्षात घेऊन हालभावी येथे बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

काकती पोलिसांनी यल्लव्वा बन्नीबागी या महिलेची चौकशी सुरू केली असून सोमवारी रात्री उशिरापर्यंत तिच्यावर एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान आज या प्रकरणातील महिलांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन यल्लव्वा बन्नीबागी या महिलेविरोधात कायदेशीर कारवाई करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बेळगाव तालुक्यातील हालभावी गावातील यल्लव्वा बन्नीबागी आणि तिचा पती कमलेशकुमार या दोघा जणांनी राणी चन्नम्मा स्वसाहाय्य संघाच्या माध्यमातून निरक्षर महिलांना 25 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवून देण्याचे सांगून फसवणूक केली आहे.

50 हजारांचे कर्ज मिळवून दिल्यानंतर 25 हजार रुपये यल्लव्वा आपल्याकडे घेत होती. केवळ 25 हजार संबंधित महिलांना देत होती. यापुढे तुम्ही कर्ज भरायची गरज नाही, तुम्ही घेतलेले कर्ज आम्हीच भरणार आहे, असे सांगण्यात येत होते. शेवटी थकबाकी वाढल्यामुळे कर्ज घेतलेल्या महिलांना बँकांकडून नोटिसा सुरू झाल्या. त्यामुळे आपण फसलो गेलो, हे त्या महिलांच्या लक्षात आले. ठरल्याप्रमाणे उर्वरित कर्जाचा भरणा तुम्हीच करा, अशी मागणी करीत फशी पडलेल्या महिलांनी सोमवारी यल्लव्वाच्या घराला घेराव घातला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तिला ताब्यात घेऊन काकती पोलीस स्थानकात आणले.Womem protest

यल्लव्वाने नेमके किती महिलांच्या नावे कर्ज उचलले आहे, त्याचा आकडा किती, याचा उलगडा झाला नाही. मात्र, घराला घेराव घातलेल्या महिलांची संख्या लक्षात घेता हा आकडा मोठा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून चौकशी पूर्ण झाल्यावरच यासंबंधीची अधिक माहिती उपलब्ध होणार आहे.

दरम्यान फसवणूक झालेल्या महिलांनी आज जिल्हा काँग्रेस भवन येथे जमावाने पालकमंत्र्यांची भेट घेत घडल्या प्रकारची माहिती सांगितली. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांनी थकबाकी भरणे अवघड असल्याचे सांगितले.संबंधित महिलेने आपली फसवणूक केली असून आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.