Thursday, December 12, 2024

/

यासाठी झाले राजहंसगड येथील वॉर्ड सभा रद्द….

 belgaum

बेळगाव लाईव्ह :राजहंसगड येथील वॉर्ड सभा आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी रद्द केली. गावातील विविध विषय, त्याचबरोबर गावातील समस्यावर चर्चा करण्यासाठीं सकाळी गावात दवंडी देऊन वॉर्ड सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी ग्राम पंचायत विकास अधिकारी, ग्राम पंचायत अध्यक्ष, सदस्य हजर होते.

वॉर्ड सभेला सुरवात होताच येथील नागरिकांनी ३२ गुंठे जमीनीच्या मोजणी बाबत विचारांना केली व ज्यांनी कुणी ५ एकर जमीन मोजणीचां अर्ज दिला आहे तो दिशाभूल करणारा आहे त्यामध्ये नागरिकांच्या बोगस सही करून अर्ज दाखल करण्यात आला आहे, तरी याची चौकशी करून सर्वप्रथम ३२ गुंठे चां सर्वे करा मगच वार्ड सभा असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला,

तसेच गावात जल जीवन मिशन योजनेंतर्गत राबिण्याबाबत आलेली पाण्याची स्कीम कुचकामी ठरली असून त्याची चौकशी करा , त्याचबरबर महादेव गल्ली व मारुती गल्लीच्या पाठीमागील भंगी रस्त्याचे काम का करत नाही, जोपर्यंत ही कामे होत नाहीत तोपर्यंत वार्ड सभा होऊ देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थानी घेतली त्यामुळे ही वार्ड सभा रद्द करण्यात आली आहे.Rajhans gadh

तसेच मोजणी करतेवेळी अधिवेशन व पोलीस संरक्षण चे कारण सांगून p d o नी पळ काढला होता अजूनही अधिवेशन सुरू आहे मग आज कसे काय वॉर्ड सभेचे आयोजन करण्यात आले होते व कोणतेही संरक्षण नसताना सभा कशी भरविण्यात आली असा प्रश्न गावकऱ्यातून होत आहे.आता याची संपूर्ण जवाबदारी पी डी ओ वर असून सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सभेसाठी लक्ष्मण थोरवत, शिप्पय्या बुर्लकट्टी, पी जी पवार, गंगाधर पवार, हणमंत नावगेकर, नानाजी लोखंडे, गुरुदास लोखंडे, सिद्धाप्पा पवार, सुरेश थोरवत, महादेव चव्हाण यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.