बेळगाव लाईव्ह :महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बेळगाव येथील काँग्रेस अधिवेशनाच्या 100 वा वर्धापन दिन उद्या गुरुवारी 26 व शुक्रवारी 27 डिसेंबर 2024 रोजी साजरा केला जाणार असून त्याची कार्यक्रम पत्रिका खालील प्रमाणे असणार आहे.
1924 मध्ये झालेल्या काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाच्या शताब्दी निमित्त उद्या गुरुवारी बेळगाव येथे काँग्रेस कार्यकारिणीची सीडब्ल्यूसी विस्तारित बैठक होणार आहे. या बैठकीत 2025 साठी पक्षाच्या कृती आराखड्याची निर्मिती केली जाणार आहे.
सदर देशातील 200 नेत्यांचा सहभाग असणाऱ्या बैठकीला ‘नवसत्याग्रह’ बैठक असे नांव देण्यात आले आहे. याच दिवशी रामतीर्थनगर येथील गंगाधरराव देशपांडे स्मारकाचा अनावरणाचा कार्यक्रम होईल.
तसेच वीरसौध जवळ दुपारी 3 वाजता काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक होणार असून रात्री 7 वाजता अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (एआयसीसी) अध्यक्षांच्यावतीने मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानंतर शुक्रवारी 27 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते सुवर्णसौध येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे.
त्यानंतर ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅली होणार आहे. शहरातील सीपीएड कॉलेज मैदानावर दुपारी 1 वाजता जाहीर सभा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्यावतीने मेजवानेचे आयोजन करण्यात येणार आहे.