बेळगाव लाईव्ह : बेळगावातील छायाचित्रकार बसप्पा होसुर याच्या अपहरण प्रकरणी संबंधित सर्व आरोपींना सशर्त जामीन मंजूर करण्यात आले आहे. आरोपींनी खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला असून 9 व्या अतिरिक जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजुरीसाठी काही अटी घालून आरोपींना जामीन दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, 22 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री, छायाचित्रकार बसप्पा होसुर याचे शिव बसव नगर येथून अपहरण करून खून करण्याचा प्रयत्न केला गेला गेला. आरोपींनी त्याला लोखंडी रॉडने मारहाण केली, आणि नंतर पोलिस स्टेशनसमोर सोडून दिले होते. याप्रकरणी माळमारुती पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
यामध्ये बसवराज वीरुपक्षप्पा नरटी,प्रदीप (प्रवीण मारुती उमराणी), विकास (विकी सुरेश पमार), ओमकार विजय, विजय सिंग घोरपडे, किरण (केपांना परसाप्पा मुरकी भावी), मलेनगवडा बसनगौडा पाटील, तारा ( श्रीकांत कमती), धनलक्ष्मी बसवराज नरटी आदी आरोपींचा समावेश होता.
न्यायालयाने जामीन मंजुरीसाठी काही अटी घातल्या असून आरोपींना तपासात सहकार्य करणे, आणि साक्षीदारांना धमकी देऊ नये असे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपींच्या वतीने एड. शामसुंदर पत्तार, हेमराज बेंचनावर, आणि शंकर बाळ नाईक यांनी काम पाहिले.