Monday, December 2, 2024

/

बेळगाव विमानतळ नव्या टर्मिनल इमारत कामाला गती

 belgaum

बेळगाव लाईव्ह :वाढत्या मागणीची पूर्तता करणे आणि एकूण प्रवाशांचा अनुभव वाढवणे या उद्देशाने बेळगाव विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाला चेन्नई येथील प्रादेशिक मुख्यालयातील महाव्यवस्थापक (अभियांत्रिकी) यांच्या मार्गदर्शनाखाली गती मिळत आहे.

बेळगावला नुकत्याच दिलेल्या आपल्या भेटीदरम्यान महाव्यवस्थापकांनी (अभियांत्रिकी) कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि बांधकामाच्या जागेची आणि विमानतळाच्या कार्यान्वित क्षेत्राची सखोल पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) अभियंते आणि बेळगाव येथील टर्मिनल बांधकामाची जबाबदारी असलेल्या एजन्सीचे अधिकारी व अभियंते उपस्थित होते.

वाढत्या प्रवासी वाहतुकीला सामावून घेण्यासाठी आणि प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने बेळगाव विमानतळाची नवीन टर्मिनल इमारत बांधली जात आहे. हा प्रकल्प येत्या 2026 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. नवीन टर्मिनल सुरक्षितता, सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या सर्वोच्च मानकांची पूर्तता करेल याची खात्री करण्यासाठी विमानतळ अधिकारी सध्या परिश्रमपूर्वक काम करत आहेत.Terminal bldg

सदर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नवीन टर्मिनलमध्ये 4 एरोब्रिज असतील. ज्यांच्यामुळे पीक-अवर अर्थात गर्दीच्या वेळेतील 2,400 प्रवासी (1,200 आगमन आणि 1,200 निर्गमन) हाताळण्यासाठी विमानतळाच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होईल. एएआयचे सल्लागार लँड्रम आणि ब्राउन यांच्या मते एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, सध्याचे टर्मिनल आगमन व्यवस्थापित करण्यासाठी पुन्हा वापरण्यात येईल.

ज्यामुळे 2037 पर्यंत विमानतळाला वार्षिक 2.0 दशलक्ष प्रवाशांची रहदारीची मागणी (एमपीपीए) पूर्ण करता येईल. बेळगाव विमानतळासाठी आंतरराष्ट्रीय मानक टर्मिनल इमारत – पंतप्रधान मोदी यांनी बेळगाव विमानतळासाठीच्या आंतरराष्ट्रीय मानक टर्मिनल इमारत व प्रवास विम्याची पायाभरणी केली.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे बेळगावचे सध्याचे देशांतर्गत टर्मिनल व्यवस्थापित केले जाते. त्याचे बांधकाम क्षेत्र 3,600 चौ. मी. आहे. ज्यामध्ये 300 पीक-अवर प्रवासी सामावू शकतात. याव्यतिरिक्त विमानतळाचे एप्रन बी737 आणि ए320 सारखी 6 अरुंद आकाराची विमाने हाताळू शकते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.