बेळगाव लाईव्ह : 2017 मध्ये झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याच्या संदर्भात टिळकवाडी पोलिस स्टेशनने समितीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध सीसी 424/2020 गुन्हा दाखल केला होता.
बुधवारी या खटल्यात साक्ष नोंदवण्यासाठी असिस्टंट सब-इन्स्पेक्टर एच एच पमार हे न्यायालयात हजर झाले. समितीच्या वतीने या खटल्यात अनेक वकिलांचा संघ न्यायालयात उपस्थित होता.
2017 मध्ये व्हॅक्सिन डेपोवर आयोजित महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याच्या संदर्भात टिळकवाडी पोलीस स्टेशनने समितीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध सीसी 424/2020 गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात माजी आमदार दीपक दळवी, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर मनोहर किनेकर, खजिनदार मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे विकास कलघटगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या खटल्याच्या सुनावणीमध्ये आज पोलिसांच्या वतीने असिस्टंट सब-इन्स्पेक्टर एच एच पमार यांची साक्ष नोंदवली गेली.
समितीच्या वतीने या खटल्यात एडवोकेट महेश बिर्जे, एडवोकेट एम. बी. बोंद्रे, एडवोकेट बाळासाहेब कागणकर आणि एडवोकेट वैभव कुटरे यांनी काम पाहिले. पुढील सुनावणी 16 जानेवारी 2025 रोजी होणार आहे.