Wednesday, December 4, 2024

/

मैसूर दसऱ्याच्या धर्तीवर बेळगावला सजविण्यासाठी हेस्कॉम एम डी बेळगावात

 belgaum

बेळगाव लाईव्ह : १९२४ साली बेळगावमध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला यंदा १०० वर्षे पूर्ण होत असून या पार्श्वभूमीवर शतक महोत्सव तसेच गांधी भारत यासह अनेक उपक्रम प्रशासकीय पातळीवर राबविण्यात येणार असून हा सोहळा भव्य-दिव्य साजरा करण्यासाठी प्रशासनासहित हेस्कॉम विभाग देखील सज्ज झाला आहे.

आज बेंगळुरू येथे झालेल्या बैठकीत बेळगाव अधिवेशन शतकमहोत्सवानिमित्त महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली असून हा शतकमहोत्सव म्हैसूर दसरा उत्सवाच्या धर्तीवर साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर संपूर्ण बेळगाव शहराला विद्युत रोषणाई करण्यात येणार असून यासाठी आज हेस्कॉमच्या हुबळी विभागाच्या एमडी वैशाली एम एल यांनी बेळगाव शहराचा सर्व्हे करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

बेळगावमधील प्रमुख रस्ते, चौक, महत्वाची ठिकाणे, ऐतिहासिक स्थळे, स्मारके यासह प्रामुख्याने टिळकवाडी येथील काँग्रेस विहीर, विरसौध, आर. पी. डी. सर्कल असा अंतर्गत  एकंदर 32 किलोमीटर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघणार आहे. येत्या ७ डिसेंबर पासून विद्युत रोषणाईच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.Hescom bgm

अधिकाधिक रोषणाई करून काँग्रेस अधिवेशन शतकमहोत्सव म्हैसूर दसऱ्याच्या धर्तीवर झगमगाटात साजरा करण्यात येणार आहे. २६ आणि २७ डिसेंबर असे दोन दिवस बेळगावमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अधिवेशनादरम्यानही रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईचे कामकाज होणार आहे. यासंदर्भात आज हुबळी हेस्कॉम विभागाच्या एम डी वैशाली एम. एल. यांनी हेस्कॉम अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले असून बेळगावकरांसाठी हा सोहळा अविस्मरणीय ठरणार आहे.

यावेळी हेस्कॉम हुबळी टेक्निकल विभागाचे संचालक एस जगदीश, बेळगावचे मुख्य अभियंते के. जी. हिरेमठ, प्रवीण चिकार्डे, शिवाजी खरे, शहर विभागाचे कार्यकारी अभियंते मनोहर सुतार, ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंते विनोद केरूर आदींसह हेस्कॉमचे विविध अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.