बेळगाव लाईव्ह : बेळगाव झालेल्या १९२४ साली काँग्रेस अधिवेशनाच्या शतकपूर्तीनिमित्त आयोजनासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय यांच्या अध्यक्षतेखाली बेंगळूर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि काँग्रेसचे पदाधिकारी आमदार या बैठकीत उपस्थित होते.
काँग्रेस कार्यकारी समितीची प्रचंड मोठी बैठक बेळगावत होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या संदर्भातील प्रक्रियेला सुरुवात करून काँग्रेस कार्यकारणी बैठकीच्या एकंदर प्रक्रियेला आपली मान्यता दिली आहे. 26 डिसेंबर रोजी ही बैठक बेळगाव होणार असून 27 ला भव्य पब्लिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
1924 मध्ये झालेल्या बेळगाव येथील काँग्रेसच्या अधिवेशनाच्या शंभर वर्षेपूर्तीच्या निमित्ताने त्या पद्धतीची बैठक आयोजित करण्याचा निर्णय काँग्रेसने वरिष्ठ पातळीवर बेंगळूर येथे विशेष बैठकीच्या माध्यमातून घेतला आहे.
या शतक पूर्तीनिमित्त वर्षभर गांधी भारत नावाने विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
मैसूर दसराच्या धरतीवर हा सोहळा होणार असून बेळगाव मधील 30 महत्त्वाच्या चौकात केंद्रातून आणि 32 किलोमीटरच्या मार्गावर विद्युत रोषणाई केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 2.1 किलोमीटरच्या काँग्रेस रोडवर तात्पुरत्या स्वरूपातील गोपुरांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी विशेष विमानांची व्यवस्था करण्यात येणार असून रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूंनी हे गोपूर उभे केले जाणार आहेत.
बेळगाव येथील ऐतिहासिक वीरसौधचा विकास केला जाणार आहे. या ठिकाणी एका ग्रंथालयाची स्थापना केली जाणार असून महात्मा गांधीजींचा भव्य पुतळा उभा केला जाणार आहे. याच बरोबरीने कर्नाटकात महात्मा गांधीजींनी भेट दिलेल्या 120 ठिकाणी स्मृती स्थळ उभारले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.