Wednesday, January 22, 2025

/

इराकी बाळासाठी डॉ. दीक्षित बनले तारणहार

 belgaum

बेळगाव लाईव्ह :देवतारी त्याला कोण मारी असे आपण म्हणत असतो. याचाच प्रत्यय अरिहंत हॉस्पिटलमध्ये आला. सातासमुद्रापार असलेल्या इराकमधील तीन महिन्यांच्या बाळावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर बाळाला जन्मजातच कोआर्कटेशन ऑफ द आयोर्टा हा आजार झाला होता. या आजारामध्ये महाधमनीचा (आयोर्टा) भाग अरुंद असतो. जो हृदयातून शरीरात रक्त पोहोचवतो.

वेळेवर उपचार न मिळाल्यास हा आजार गंभीर होऊन उच्च रक्तदाब, हृदय निकामी होणे किंवा मृत्यू देखील होऊ शकतो. नवजात बालकांमध्ये हा आजार प्रामुख्याने खाण्यात अडचण, घाम येणे, आणि वेगाने श्वास घेणे अशा लक्षणांनी दिसून येतो. यावेळी ही उपचारासाठी अत्यंत अचूक आणि प्रगत शस्त्रक्रिया आवश्यक असते.

डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली असून बाळाची प्रकृतीही पूर्णपणे बरी असून ते आता आपल्या मायदेशी परतले आहे. सदर बाळाला हायपोप्लास्टिक आयोर्टिक आर्च, पीडीए (पेटंट डक्टस आर्टेरिओसस) आणि एएसडी (एट्रिअल सेप्टल डिफेक्ट) सह महाधमनीचे सीएचडी-सिव्हियर कोआर्टेशन आजाराने ग्रासले होते. पण डॉ. एम. डॉ. दीक्षित यांनी एकाच वेळेला सर्व आजारातून बाळाची सुटका करून त्याचे उज्ज्वल भविष्य केले.

या बाळाचे कुटुंबीय इराकमधील बगदाद येथील आहे. त्यांनी त्यांच्या देशात उपचारांच्या अनेक पर्यायांचा शोध घेतल. परंतु या आजारावर यशस्वी उपचारासाठी त्यांना कोठेही योग्य सल्ला मिळाला नाही. पण कुटुंबीयांनी विविध माध्यमातून डॉ. एम. डी. दीक्षित यांची माहिती मिळविली. यानंतर त्यांनी संपर्क साधून आपल्या बालकास बेळगाव गाठले. सुरुवातीला बाळाच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या.

यानंतर डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या अद्वितीय अनुभव कौशल्यामुळे यशस्वी शस्त्रक्रिया करून बाळाला नवजीवन देण्यात आले. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. अमृतराज नेर्लीकर, डॉ. संतोष हुक्केरी, डॉ. निखिल दीक्षित, डॉ. प्रशांत एम. बी., डॉ. अविनाश लोंढे यांच्यासह कुशल परिचारिकांनी परिश्रम घेतले.Dixit

बाळाच्या वडिलांनी आपले आभार व्यक्त करताना सांगितले की, आमच्या देशात संपत्ती आणि संसाधने आहेत. परंतु डॉ. एम. डी. दीक्षित यांच्यासारखे तज्ज्ञ हृदयरोग सर्जन किंवा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. भारतातील वैद्यकीय सुविधा उत्कृष्ट असून येथे आम्हाला मिळालेल्या सेवेसाठी आम्ही खूपच आभारी आहोत. अरिहंत हॉस्पिटल हे डॉ. एम. डी. दीक्षित यांच्यामुळे जगभरातील हृदयरोग रुग्णांसाठी आशेच केंद्र बनल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

डॉ. दीक्षित हे अनेक दशकांपासून रुग्णांचे जीवनमान वाचवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. उत्तर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा येथेही त्यांनी आपल्या अचूक हृदयरोग उपचारासाठी प्रसिद्ध असून अरिहंत हॉस्पिटल रुग्णांसाठी विश्वास आणि उत्कृष्टतेचे प्रतीक बनले आहे. त्याचबरोबर डॉ. एम. डी. दीक्षित त्यांच्या शांत, प्रेमळ आणि प्रभावी उपचारामुळे जगभरातील रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी आकर्षित होत आहेत.

अरिहंत रुग्णालयाचे संचालक अभिनंदन पाटील व युवा नेते उत्तम पाटील यांनी डॉ. एम. डी. दीक्षित आणि त्यांच्या टीमचे रुग्णांप्रति असलेले समर्पण व यशस्वी कार्याबद्दल कौतुक केले. त्यांनी रुग्णालयाची वाढती ओळख व अरिहंत हॉस्पिटल हे वैद्यकीय पर्यटन केंद्र बनत असून जगभरातील रुग्णांना उन्नत व परवडणाऱ्या आरोग्य सेवा प्रदान करण्यास कटिबद्ध असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.