बेळगाव लाईव्ह : बेळगाव हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुवर्णसौध येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे झालेल्या १९२४च्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून चालू वर्षभर आयोजित केलेल्या ‘गांधी भारत’ कार्यक्रमाच्या बोधचिन्हाचे अनावरण केले.
26 आणि 27 डिसेंबर रोजी बेळगावात गांधी भारत कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 1924 मध्ये बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखालील एकमेव अधिवेशन असण्याचा मान आहे.
यानिमित्ताने गांधीजींचे जीवन, संघर्ष, स्वातंत्र्य चळवळ, देशभक्ती, सत्य, अहिंसा, आर्थिक विचार, स्वराज्य, अस्पृश्यता निर्मूलन या सर्वांवर लहान मुले व तरुणांसह सर्व वयोगटातील नागरिकांमध्येजागृती करण्यासाठी शासन कार्यक्रमांचे आयोजन करत आहे.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष यू.टी.खादर फरीद, उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार, गृहमंत्री डॉ.जी.परमेश्वर, कायदा, संसदीय कार्य व पर्यटन मंत्री एच.के.पाटील,
सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी आर. हेब्बाळकर, राज्य सरकारचे दिल्ली प्रतिनिधी टी.बी. जयचंद्र, आमदार बसवराजा रायरेड्डी, चन्नराजा हट्टीहोळी, शासनाच्या मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश व इतर मान्यवर उपस्थित होते.