बेळगाव लाईव्ह :1924 मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावमध्ये पार पडलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी वर्षानिमित्त शहरात येत्या 26, 27 व 28 डिसेंबर 2024 रोजी “गांधी भारत -100” कार्यक्रम साजरा केला जाणार आहे.
त्या अनुषंगाने शहरातील प्रमुख चौकांमध्ये केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईचे उद्घाटन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.
बेळगाव शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या वीर राणी कित्तूर चन्नम्मा चौकाच्या ठिकाणी “गांधी भारत -100” कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेल्या विद्युत रोषणाईचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी काल रविवारी सायंकाळी उद्घाटन केले.
याप्रसंगी त्यांच्या समवेत बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी स्थानिक नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये बेळगावमध्ये पार पडलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी वर्षानिमित्त शहरात येत्या 26, 27 व 28 डिसेंबर 2024 रोजी “गांधी भारत -100” कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. यासाठी शहरातील 90 चौकांसह 105 किमी अंतराचे रस्ते, रस्त्यालगतची जवळपास 300 झाडांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे सन्मान चिन्हासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर वगैरे महान व्यक्तींची विद्युत रोषणाई केलेली भव्य तैलचित्रे शहरातील चौकांमध्ये उभारण्यात आली आहेत. एकंदर “गांधी भारत -100″च्या निमित्ताने 26 ते 28 डिसेंबर या तीन दिवसाच्या कालावधीत बेळगाव शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक सायंकाळनंतर विद्युत रोषणाईने झगमगून जाणार आहेत.