बेळगाव लाईव्ह :सचिन तेंडुलकर याची भेट होणे आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणे हे क्वचितच घडत. मात्र बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथील सुकन्या असणाऱ्या शिक्षिका भारती सुतार यांना हा सन्मान लाभला. त्यांनी क्रीडा क्षेत्रात केल्या असलेल्या भरीव कामगिरीमुळे त्यांना ही संधी मिळाली याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
म्हसवड – सातारा आधुनिक स्टेडियम उद्घाटनाचा कार्यक्रम भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते दि.10 डिसेंबर रोजी झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बेळगुंदी हायस्कूलची माजी विद्यार्थिनी असणाऱ्या भारती हरीभाऊ सुतार या राष्ट्रीय खो खो व कबड्डी खेळाडू असून त्यांना या खेळामुळे जि.प. कोल्हापूर मार्फत त्यांची प्राथमिक शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली.
मुलांना दर्जेदार शिक्षण देऊन गुणवंत विद्यार्थी बनवले. त्याच बरोबर क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच खेळासाठी कु.सिरी महांतेश सुतार हिची क्रीडा प्रबोधिनीमध्ये शिंगणापूर, कोल्हापूर येथे निवड झाली त्यात भारती सुतार यांचे योगदान होते .
याच कामगिरीचा आढावा घेत शिक्षणाधिकारी यांनी भारती सुतार यांना सातारा येथे भारतरत्न मा.सचिन तेंडुलकर यांच्यासोबत भेट व संवाद साधन्याची अविस्मरनीय संधी मिळाली. यामुळे बेळगुंदी गावात व त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
यासाठी बाळासाहेब रेवाप्पा सुतार यांचे प्रोत्साहन मिळाले. सौ. भारती सुतार या राजाराम सुतार आणि व संजय सुतार बेळगुंदी यांच्या भगिनी आहेत.