बेळगाव लाईव्ह : बेळगावात 1924 साली महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी सोहळ्याच्या तयारीसाठी डी.के. शिवकुमार यांनी आज टिळकवाडी येथील विरसौध, गांधी भवनासह विविध ठिकाणांची पाहणी केली.
1924 साली महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी सोहळ्याच्या तयारीचा उपमुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यांनी पिरनवाडी येथील गांधी भवन, टिळकवाडी येथील वीरसौध आणि रामतीर्थ नगरातील गंगाधरराव देशपांडे स्मारकाला भेट दिली.
या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ राज्य सरकार आणि काँग्रेस पक्षाने “गांधी भारत” या उपक्रमांतर्गत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.डिसेंबर 26 रोजी गांधी भवनात काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होईल, तर 27 डिसेंबरला सार्वजनिक सभा आयोजित केली जाईल.
गांधी भवनात महात्मा गांधींच्या संदेशावर आधारित छायाचित्र प्रदर्शनही आयोजित केले जाणार आहे. शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेत्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. शिवाय, गांधीजी भेट दिलेल्या ठिकाणांचा विकास करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.
डी.के. शिवकुमार यांनी सीपीएड मैदानाचीही पाहणी केली. या दौऱ्यात जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार आसिफ (राजू) सेठ, माजी आमदार अंजली निंबाळकर, हमी योजना जिल्हा अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष विनय नावलगट्टी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुलद आणि जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे उपस्थित होते.