बेळगाव लाईव्ह :सभागृहातील गदारोळाप्रसंगी विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांनी उच्चारलेले आक्षेपार्ह अपशब्द रेकॉर्ड झाले नसल्याचे विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
सी. टी. रवी यांनी उच्चारलेले अपशब्द रेकॉर्ड झाले नसले तरी त्या संदर्भातील काँग्रेसच्या चार आमदारांच्या साक्ष ग्राह्य धरण्यात आल्या आहेत असे सभापती होरट्टी यांनी सांगितले.
आमच्यासमोर सी. टी. रवी यांनी अश्लील शब्द उच्चारले असे चार काँग्रेस आमदारांचे म्हणणे आहे. तथापि विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांनी उच्चारलेले ते अश्लील शब्द रेकॉर्ड झाले नसल्याचे सभापतींनी सांगितले. मात्र त्या संदर्भात यतींद्र, उमाश्री यांच्यासह चौघांनी आपण साक्षीदार आहोत असे म्हंटले आहे.
पोलिसांनी काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सी. टी. रवी यांना अटक केली आहे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह अपशब्द वापरण्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे, असे सभापती बसवराज होरट्टी यांनी सांगितले.
दरम्यान रवी यांना त्यांना पोलीस बेंगलोरला हलवण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून आज शुक्रवारी सकाळी विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांना बेंगलोर येथील लोकप्रतिनिधींच्या न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे समजते.