Thursday, December 26, 2024

/

“क्लॉक टॉवर” मधील घड्याळाची वाईट वेळ!

 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरात सध्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी समारंभाची जय्यत तयारी सुरू आहे. 26 आणि 27 डिसेंबर या दिवशी होणाऱ्या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी बेळगाव मधील कानाकोपऱ्यात आकर्षक विद्युत रोषणाई, रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी, काँग्रेस अधिवेशनाच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या मान्यवरांच्या कमानी यामुळे बेळगाव शहराच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.

परंतु शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी धर्मवीर संभाजी चौकात असणाऱ्या “क्लॉक टॉवर”कडे मात्र कुणाचेही लक्ष गेले नाही. बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असणारे हे “क्लॉक टॉवर” बेळगावच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक आहे.

काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी समारंभाच्या पार्श्वभूमीवर बारीक सारीक गोष्टींकडे आवर्जून लक्ष देण्यात आले आहे. परंतु बेळगाव शहराच्या वैशिष्ट्याची ओळख असणाऱ्या या मनोऱ्यावरील घड्याळाकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. या घड्याळाच्या बाबतीत गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षच होत आले आहे.Watch

महत्त्वाच्या कार्यक्रमादरम्यान, उत्सवादरम्यान हा मनोरा आकर्षक पद्धतीने सजवला जातो . परंतु ज्या गोष्टीमुळे या मनोऱ्याचे अस्तित्व आहे, त्या घड्याळाच्या वेळेकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते.

उंच मनोऱ्यावरील चार दिशांना असणारे हे घड्याळ बहुतांश वेळा चुकीचीच वेळ दर्शवते ! चारी बाजूच्या घड्याळामध्ये अचूक वेळ बेळगावकरांना शिवाय बेळगाव मध्ये येणाऱ्या परगावच्या नागरिकांनाही बुचकळ्यात टाकते.

सध्याही असाच प्रकार पाहायला मिळत असून निदान काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी समारंभाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधिवेशनाच्या आठवणींचा साक्षीदार होण्यासाठी या मनोऱ्यावरील घड्याळाची वेळ दुरुस्त करण्याची तसदी घेतली तर उत्तम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.