बेळगाव लाईव्ह : 1 एप्रिल 2012 साली बेळगाव शहरातील हुतात्मा चौकात पोलीस अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या आरोपातून श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर आणि अन्य यांची खडे बाजार पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शंकर गौडा पाटील यांच्यावर हल्ला केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
बेळगाव येथील तृतीय न्यायालयाच्या न्यायाधीश पल्लवी पाटील यांनी साक्षीदारांच्या विसंगतीमुळे या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश बजावला आहे.
या प्रकरणातून रमाकांत कोंडुस्कर रा. गांधीनगर, अभिजीत भातकांडे रा. पाटील मळा, रवी कोकितकर रा. हिंडलगा, परशुराम पाटील रा. कॅम्प, सचिन चव्हाण (निग्रो) रा. ओल्ड गांधीनगर, बाळू पवार रा. अनगोळ, सनील कुरणकर रा. शहापूर, कपिल भोसले रा. कपिलेश्वर रोड, विलास कंग्राळकर रा. फुलबाग गल्ली, प्रसाद अमृतकर रा. तांगडी गल्ली, अनिल मुरकुटे रा. कपीलेश्वर रोड यांची वरील खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
1 एप्रिल 2012 रोजी वरील सर्वजण बेळगाव शहरातील हुतात्मा चौकात एका प्रकरणी बंदोबस्तात असणाऱ्या पोलिसांवर हल्ला केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. हुतात्मा चौकात पोलीस अधिकारी गोंधळ करणाऱ्यांना शांत करतेवेळी या सर्वांनी पोलिस अधिकारी हल्ला केला अशी फिर्याद दाखल केली होती.
सर्व आरोपींच्या वतीने फौजदारी वकील प्रताप यादव, वकील हेमराज बेंचनंनावर ,वकील स्वप्नील नाईक,वकील निखिल कुलकर्णी यांनी काम पाहिले