बेळगाव लाईव्ह : देव तारी त्याला कोण मारी.. काळ आला होता पण वेळ आली नव्हती .. या ओळी कॅन्टर गाडीसह धरणाच्या पाण्यात कोसळलेल्या युवकाला लागू होतात. कारण या घटनेत तो केवळ दैव बलवत्तर म्हणूनच सुदैवाने बचावला आहे.
धरणाच्या बाजूला असलेल्या कच्चा रस्त्याने जाणाऱ्या गाडीचे नियंत्रण सुटल्याने कँटर जलाशयात कोसळला मात्र सुदैवाने कँटर चालक बचावल्याची घटना बुधवारी सायंकाळी 5: 30 वाजताच्या दरम्यान घडली आहे.
महेश झंगरूचे रा. सोनोली असे या घटनेत सुदैवाने वाचलेल्या युवकाचे नाव आहे.याबाबत समजलेल्या अधिक माहिती नुसार बुधवारी सायंकाळी 5: 30 वाजताच्या दरम्यान जलाशयाच्या बाजूंनी असलेल्या कच्च्या रस्त्यांनी जात असताना हा अपघात घडला आहे.
शेतातील भाजी आणण्यासाठी जात असताना कँटरचे क्लच निकामी झाले त्यानंतर गाडीचा तोल गेल्याने गाडी धरणाच्या पाण्यात कोसळली मात्र मोठ्या शिताफीने गाडीत असलेल्या महेश याने खिडकीतून पाण्याबाहेर येत स्वतःचा जीव वाचवून घेतला.
घटनास्थळी बचाव टीम पोहोचली असून रात्र झाल्याने बचाव कार्य बंद झाले आहेत. बेळगाव ग्रामीण पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
गुरुवारी सकाळी धरणात पाण्यात पडलेला कँटर बाहेर काढला जाणार आहे.ग्रामीण पोलिसांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली