बेळगाव लाईव्ह :श्रीराम सेना हिंदुस्थान, हालगा बेळगाव यांच्यातर्फे आयोजित बैलगाडा ओढण्याच्या भव्य शर्यतीतील लहान व मोठ्या गटाचे विजेतेपद अनुक्रमे श्री दुर्गादेवी प्रसन्न (एम. के. हुबळी) आणि नागेश नायक (देवलापूर) यांनी पटकावले आहे.
लक्ष्मी गल्ली लक्ष्मी चौक हालगा येथे सलग दोन दिवस आयोजित केलेली उपरोक्त भव्य शर्यत काल रविवारी सायंकाळी क्रीडाप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडली. शर्यतीचा उद्घाटन आणि बक्षीस वितरण समारंभ श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
दोन गटात घेण्यात आलेल्या या बैलगाडा ओढण्याच्या भव्य शर्यतीच्या पहिल्या दिवशी म्हणजे गेल्या शनिवारी लहान गटाची शर्यत घेण्यात आली. या शर्यती मधील पहिल्या 11 क्रमांकाचे विजेते अनुक्रमे पुढील प्रमाणे आहेत. 1) श्री दुर्गा देवी प्रसन्न (एम. के. हुबळी), 2) श्री नागनाथ प्रसन्न (विशाल) बेकनकेरी, 3)मोहम्मद गौस (एम. के. हुबळी), 4) श्री लक्ष्मीदेवी प्रसन्न (मुत्तलमुरी), 5) जय हनुमान प्रसन्न (यरमाळ सीएस),
6) श्री कलमेश्वर प्रसन्न (एम. के. हुबळी), 7) श्री सिद्धेश्वर प्रसन्न (यरमाळ यु), 8) श्री दुर्गादेवी प्रसन्न (एम. के. हुबळी बी), 9) सागर पाटील (यरमाळ), 10) विघ्नेश बसवंत काकतकर (मण्णूर), 11) मंजुनाथ पाटील (यरमाळ).
लहान गटाच्या शर्यतीनंतर काल रविवारी मोठ्या गटाची शर्यत पार पडली. या शर्यती मधील पहिल्या 11 क्रमांकाचे स्पर्धक अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत. 1) नागेश नायक (देवलापूर), 2) श्री दुर्गादेवी प्रसन्न (संतीबस्तवाड), 3) श्री चव्हाटा प्रसन्न (कणबर्गी), 4) श्री सिद्धेश्वर प्रसन्न (अणेकेरी), 5) श्री कलमेश्वर प्रसन्न (एम. के. हुबळी), 6) जय अजोनया प्रसन्न (बडाल अंकलगी), 7) श्री मंगाई देवी प्रसन्न (वडगाव), 8) श्री नागनाथ प्रसन्न (बेकीनकेरे), 9) श्री बिष्टा देवी प्रसन्न (कक्केरी),
10) विनोद गावडा, 11) श्री लक्ष्मी देवी प्रसन्न (मुतनमुरी). श्रीराम सेना हिंदुस्थान हालगा यांच्यातर्फे लहान मुलांसाठी देखील गाडा ओढण्याची शर्यत घेण्यात आली त्यामध्ये अनुक्रमे प्रवीण अंजुर, सुमित चिकपराप्पा, कृष्णा कामाणाचे, प्रीतम चिकपराप्पा व समर्थ कामती यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक मिळविला.
रविवारी सायंकाळी उशिरा पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी शर्यतीच्या मोठ्या व लहान गटातील पहिल्या दोन क्रमांकाच्या विजेत्यांना अर्जुन बाळेकुंद्री यांच्यातर्फे मेंढा बक्षीसा दाखल देण्यात आला. त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते अन्य पुरस्कर्त्यांकडून इतर विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके प्रदान करण्यात आली. शर्यत यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्तान हालगा यांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.